राष्ट्रीय ओबीसी महासंघ ही संपूर्ण भारतात ओबीसी (National OBC Women’s Federation) समाजाच्या संवैधानिक हक्कांसाठी मागील ८-९ वर्षांपासून सातत्याने लढणारी संघटना असून या संघटनेच्या महिलांची एक स्वतंत्र शाखा म्हणजे राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ होय, महिला महासंघाचे हे दुसरे अधिवेशन असून या महिला महासंघाचे आयोजन दि.३ डिसेंबर, २०२३ ला काँग्रेड भाई बर्धन ऑडोटोरीअम, ३ रा मजला, परवाना भवन, किंग्ज वे हॉस्पीटलच्या मागे, स्टेशन रोड, नागपूर येथे सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आले आहे.
या अधिवेशनाचे उद्घाटक आमदार प्रतिभाताई धानोरकर, चंद्रपूर हया करणार असून अधिवेशनाचे अध्यक्ष, डॉ. बबनराव तायवाडे, अध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघ हे गुषविणार आहेत. सदर अधिवेशन दोन सत्रामध्ये आणि विविध महिला वक्त्यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे. तसेच विशेष स्पर्धा म्हणून विचारांचा पेहराव या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने ओबीसी महिलांचे प्रबोधन करण्यासाठी अॅड. ज्योती ढोकणे, सुदृढ ओबीसी समाज घडविण्यासाठी ओबीसी महिलांचा सहभाग, संध्या सराडकर, जेष्ठ साहित्यीक या ओबीसी समाजाचे अस्तित्व व मंडल आयोगाचे भरीव काम, डॉ. अपर्णा पाटील ओबीसी महिलांचे सामाजिक व राजकीय अस्तित्व, अॅड. जयश्री शेळके शतकातील ओबीसी महिलां समोरील आव्हान या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
(हेही वाचा-Mumbai : रेल्वेतील गर्दी व्यवस्थापनासाठी टपाल कार्यालयाची उपाययोजना, कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल)
आज देशामध्ये ओबीसी समाजा मध्ये चेतना निर्माण करण्यासाठी अनेक व्यक्ती संघटना पुढे येत आहेत.या अधिवेशनात ओबीसी च्या हक्कांसाठी चंद्रपूर येथे आमरण उपोषण करणारे रविंद्र टोंगे, विजय बल्की, प्रेमानंद जोगी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या विविध कार्यक्रमाचे आयोजन या अधिवेशनात करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या (National OBC Women’s Federation) पदाधिका-यांनी कळविले आहे.
यात श्रीमती सुषमा भड, अध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ, कार्याध्यक्ष डॉ. शरयुताई तायवाडे, उपाध्यक्ष डॉ. रेखा बारहाते, सचिव अंड, समिक्षा गणेशे, प्रदेशाध्यक्ष कल्पनाताई मानकर, विदर्भ प्रदेशाध्यक्ष विजयाताई धोटे, शहराध्यक्ष सौ. वृंदाताई ठाकरे, युवती अध्यक्ष सौ. रुतिका डाफ मसगारे, सौ. साधना बोरकर, पुजा मानमोडे, प्रांजली ताल्हण यांनी कळविले आहे. सदर अधिवेशनागध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व कक्षांच्या पदाधिका-यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे प्रोत्साहन महिलांना करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community