राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार Ajit Doval यांचा कार्यकाळ वाढवला

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार Ajit Doval यांचा कार्यकाळ पुन्हा वाढवण्यात आला आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव पीके मिश्रा यांनाही सेवेत मुदतवाढ मिळाली आहे.

125
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार Ajit Doval यांचा कार्यकाळ वाढवला
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार Ajit Doval यांचा कार्यकाळ वाढवला

जम्मू-काश्मीरमधील पाकिस्तानप्रेरित दहशतवाद आणि देशात आणि परदेशात खलिस्तानच्या (Khalistan) उदयाला तोंड देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे NSA अजित डोवाल (Ajit Doval) यांना सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. भारताच्या अरब देशांसोबतच्या चांगल्या संबंधांचे श्रेयही डोवाल यांना दिले जाते.

(हेही वाचा – Pune Car Accident: पुण्यातील ड्रंक अँड ड्राइव प्रकरणावर अनिल देशमुख यांचा गंभीर आरोप म्हणाले…  )

प्रधान सचिव पीके मिश्रा यांनाही मुदतवाढ

९ जून रोजी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर १० जून रोजी देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव पीके मिश्रा यांनाही सेवेत मुदतवाढ मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने या दोन्ही पदांवरील सेवा विस्तारास मान्यता दिली आहे. आता अजित डोवाल पुढील ५ वर्षे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदावर राहणार आहेत.

त्यांनी केलेले काम खूप कौतुकास्पद

केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, ‘मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने अजित डोवाल यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. त्यांची १० जून २०२४ रोजी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ पुढील आदेशापर्यंत कायम राहील. मोदी सरकारच्या काळात अजित डोवाल यांना कॅबिनेट दर्जा मिळला आहे. अजित डोवाल हे आयपीएस अधिकारी आहेत आणि गुप्तचर अधिकारी म्हणून त्यांनी केलेले काम खूप कौतुकास्पद आहे.

अजित डोवाल यांना कॅबिनेट दर्जाच्या अधिकाऱ्याचा दर्जा मिळाला आहे. नव्या सरकारच्या स्थापनेनंतर अजित डोवाल (Ajit Doval) हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासोबत इटलीला जाणार आहेत. येथे ते G-7 शिखर परिषदेत सहभागी होतील.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.