“सरकार पाडण्याचा कट वर्षभरापूर्वीच”

113

रायगड जिल्ह्यात पालकमंत्री हटाव मोहीम हाती घेतल्यानंतर, शिवसेनेचे तिन्ही आमदार अलिबाग येथील मेडिकल काॅलेजच्या भूमिपूजन प्रसंगी अनुपस्थित होते. या दरम्यान, ही सगळी मंडळी भाजप नेत्यांच्या संपर्कात होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर, अधिवेशनात संपूर्ण हकीकत सांगत होते. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना हात जोडून आता बस करा अशी विनंती केली. याचा अर्थ असा की या सगळ्या मंडळींनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा कट वर्षभरापूर्वीच केला होता, असे वक्तव्य राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी केले. भविष्यात त्यांचे सर्व कारनामे उघड करुन हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही तटकरे यांनी दिला.

तटकरे पुढे म्हणाले की, सत्ता गेली तरी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर पु्न्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना सामोरे जाणार आहे. कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवून पुन्हा एकदा जोमाने कामाला लागावे, असे आवाहन यावेळी तटकरे यांनी केले.

( हेही वाचा: पुस्तकांचीही झाली होती फाळणी; त्यावेळचा ‘हा’ जगप्रसिद्ध फोटो पाहिलात का? )

यांचीही उपस्थिती 

सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मी 12 ऑगस्टपासून जिल्ह्याचा दौरा करणार असल्याचे ते म्हणाले. सुतारवाजी येथे रविवारी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी येथील मधुकर पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी माजी पालकमंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, प्रदेश सरचिटणीस विजय मोरे, कार्याध्यक्ष मधुकर पाटील आदी उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.