शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे दोन दिवसीय चिंतन शिबिर सुरू होण्यापूर्वी, पक्षाचे दोन बडे नेते दिलीप वळसे पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांनी पालिका निवडणुकांबाबत परस्परविरोधी विधाने केली. (Nationalist Congress Party)
(हेही वाचा- Electricity Transport Capacity : मुंबईच्या वीजवाहन क्षमतेत लक्षणीय वाढ: ४२०० मेगावॅट विजेचा वाहतूक क्षमतेचा नवा टप्पा)
माध्यमांशी बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, “जर आघाडी झाली तर ठीक आहे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढण्यासाठी पूर्णतः तयार आहे.” त्यांच्या या वक्तव्याने आघाडीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. (Nationalist Congress Party)
दुसरीकडे, प्रफुल्ल पटेल यांनी पालिका निवडणुकीसाठी महायुतीचा मुद्दा मांडत सांगितले की, “जिथे शक्य असेल, तिथे महायुती म्हणून एकत्र लढण्याची आमची तयारी आहे.” यावरून पक्षाच्या धोरणांबाबत स्पष्टता नसल्याचे दिसून येत आहे. (Nationalist Congress Party)
या दोघांच्या वक्तव्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये रणनीतीबाबत मतभेद असल्याचे संकेत मिळत आहेत. कार्यकर्त्यांमध्येही या विरोधाभासी विधानांमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. (Nationalist Congress Party)
पालिकेच्या निवडणुकांसाठी महायुतीचा विचार अजून ठोस पातळीवर झालेला नसल्याचे दिसते. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका कशी असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Nationalist Congress Party)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community