महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना रश्मी ठाकरे यांच्या हट्टामुळे सुरुवातीला आदित्य ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे आणण्याचा प्रयत्न झाला, पण ते शक्य नसल्याचे लक्षात येताच संजय राऊत आणि अनिल देसाई यांनी मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांचा आग्रह शरद पवार यांच्याकडे धरला होता, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला आहे. (Lok Sabha Election 2024)
तसेच संजय राऊत खोटं बोलतात. एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाला संजय राऊतांचा विरोध होता, असा हल्लाबोल राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी संजय राऊतांवर केला आहे. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Pune Porsche Car Accident: पुण्यात बुलडोझर पॅटर्न! अवैध पबवर पालिकेची धडक कारवाई)
…आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात आलं
ते पुढे म्हणाले की, 2019 साली जाणीवपूर्वक शरद पवार यांनी अजित पवार व्हिलन होतील अशी भूमिका घेण्यात आली होती; कारण त्यावेळी शिवसेनेचा मुख्यमंत्री करायच होतं त्यावेळी एकनाथ शिंदे यांना करणार होते, मात्र रश्मी ठाकरे यांच्या हट्टामुळे आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करावं असं ठरलं, पण शरद पवार यांनी त्याला नकार दिला. त्यानंतर मुख्यमंत्री पद अडीच वर्ष शिवसेना आणि अडीच वर्ष सुप्रिया सुळे मुख्यमंत्री राहतील. त्यामुळेच भाजपासोबत आमची जी डील झाली होती. ती फिरवण्यात आली आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. अजित पवार यांना क्षमा करून उपमुख्यमंत्री केलं, असा दावा करतात; परंतु शरद पवार यांना पर्याय नव्हता म्हणून त्यांना अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करावं लागलं कारण सर्व आमदारांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करा, अशी मागणी केली होती, असे अनेक गौप्यस्फोट उमेश पाटील यांनी केले आहेत.
मतदानाबाबत चौकशी समिती
उद्धव ठाकरे यांचे नेहमीचं रडगाणे आहे. उद्धव ठाकरे यांना जर यंत्रणेवर विश्वास नाही, तर कोणत्या आधारावर तुम्ही छाती ठोकून सांगत आहे की, आमच्या जास्त जागा येतील. मतदान हे जास्तीच व्हायला पाहिजे ते कमी का झाले याची चौकशी व्हायला समिती नेमली आहे, असेही उमेश पाटील म्हणाले.
हेही पहा –