सध्या मोदी सरकारने कोणतेही धोरण घेतले तरी त्यावर काँग्रेस तोंडसुख घेते, त्यामुळे काँग्रेस आणि मोदी सरकारवर टीका हे समीकरण बनले आहे, पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मात्र मोदी सरकारचे कौतुक करताना दिसत आहेत. युपीए सरकारमधील विदेश मंत्री नटवर सिंह यांनी मोदी सरकारचे तोंडभरून कौतुक केले.
रशियासंबंधी सरकारचे धोरण चांगले
हिंदुस्थान पोस्टला दिलेल्या मुलाखतीत माजी मंत्री नटवर सिंह यांनी युक्रेन आणि रशिया या युद्धासंबंधी भारताचे धोरण चांगले आहे. अमेरिकेत मानवाधिकारावरून भारतावर कुरघोडी करण्यात आली, त्यावर भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी जी टीका केली ती योग्यच आहे. याधीही सिंह यांनी हेच मत मांडले होते, भारताचे रशियाशी खूप चांगले संबंध आहेत. आम्हाला तेथून शस्त्र उपलब्ध होत असतात. काश्मीर हा भारताचा भाग असल्याचे रशियाने वारंवार म्हटले आहे, मात्र अमेरिका आणि फ्रान्सकडून याला कोणतीही मान्यता मिळालेली नाही, असे ते म्हणाले होते.
गांधी कुटुंबावर केली होती टीका
नटवर सिह यांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना त्यांच्या पदावरून हटवल्याबद्दल गांधी कुटुंबावर टीका केली होती. सध्या पक्षाची जी अवस्था आहे यासाठी फक्त तीन लोक जबाबदार आहेत. राहुल गांधी यांच्याकडे कोणतेही पद नाही तरीही ते पक्षाचे सर्व निर्णय घेतात, असेही ते म्हणाले.
Join Our WhatsApp Community