ओडिशाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि झारसुगुडाचे आमदार नाबा किशोर दास सार्वजनिक सभेला जात असताना त्यांच्यावर एका अज्ञाताने गोळ्या झाडल्या. आरोग्यमंत्र्यांवर चार ते पाच गोळ्या झाडल्याचे सांगितले जात आहे. या गोळीबारात आरोग्यमंत्री गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
( हेही वाचा: अभिमानास्पद! भारतातील तरुणांच्या आत्महत्या प्रतिबंध राष्ट्रीय सल्लागार परिषदेत महाराष्ट्राच्या तरुणाची निवड )
नेमके काय घडले?
एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ओडिशाचे आरोग्यमंत्री नाबा दास आले होते. त्यावेळी ते कारमधून उतरल्यानंतर त्यांच्यावर गोळ्या चालवण्यात आल्या. ASI ने त्यांच्यावर फायरिंग केले. या पोलीस कर्मचा-याने त्यांच्यावर गोळी का झाडली ते समोर आलेले नाही. यानंतर तातडीने नाबा दास यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव आहे.
Join Our WhatsApp Community