ओडिशातील बीजेडी अध्यक्ष नवीन पटनायक (Naveen Patnaik) यांनी बुधवारी ५ जून रोजी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. भुवनेश्वर येथील राजभवनात जाऊन त्यांनी राज्यपाल रघुवर दास (Governor Raghuvar Das) यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. पटनायक गेली २४ वर्षे राज्याचे मुख्यमंत्री होते. मंगळवारी, ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीसोबतच ओडिशा आणि आंध्र प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांचे निकालही (Assembly election results in Odisha and Andhra Pradesh) आले. दोन्ही राज्यात विद्यमान सरकारांची सत्ता गेली. यामध्ये ओडिशात भाजपला १४७ पैकी ७८ जागा मिळाल्या, तर बीजेडीला ५१ जागा मिळाल्या. (Naveen Patnaik)
(हेही वाचा – Lok Sabha Election Result 2024: पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींकडे दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा!)
राज्यात प्रथमच भाजपा एकट्याने पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार आहे. भाजपाने अद्याप मुख्यमंत्र्यांची घोषणा केलेली नाही. पक्षाने केवळपंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या तोंडावर निवडणूक लढवली. तर ओडीशात लवकरच भाजपा नवीन सरकार स्थापन करण्याचा दावा करू शकते.
ओडिशामध्ये २००० पासून सातत्याने सत्तेत असलेल्या बीजदला सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून काम करण्याचा विक्रम पटनायक करू शकले नाहीत. बीजेडी अध्यक्ष नवीन पटनायक २४ वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत. ५ मार्च २००० रोजी त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तेव्हापासून ते २०१९ पर्यंत ते ५ वेळा ओडिशाचे मुख्यमंत्री () राहिले आहेत. नवीन पटनायक (२४ वर्षे ८३ दिवस) हे सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन चामलिंग (२४ वर्षे १६५ दिवस) नंतर मुख्यमंत्रीपद भूषवणारे देशातील दुसरे नेते आहेत. बीजेडीचे सरकार पुन्हा स्थापन झाले असते, तर नवीन पटनायक सर्वाधिक काळ मुख्यमंत्री बनले असते. (Naveen Patnaik)
(हेही वाचा – Pakistan Dinner Party : पाक क्रिकेटपटूंनी अमेरिकेत भरवली खाजगी डिनर पार्टी)
बीजेडी-भाजपाने दोनदा युती करून सरकार स्थापन केले होते. त्यावेळी बीजेडी हा एनडीएचा सर्वात विश्वासू पक्ष मानला जात होता. सन २००० मध्ये बीजेडीला ६८ तर भाजपाने ३८ जागा जिंकल्या होत्या. १४७ पैकी १०६ जागांसह, दोन्ही पक्षांनी प्रथमच युतीचे सरकार स्थापन केले आणि काँग्रेसला सत्तेतून बाहेर काढले. २००४ च्या निवडणुकीत भाजप आणि बीजेडीने एकूण ९३ जागा जिंकल्या.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community