शिवसेनेचे प्रबळ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर, आता अनेक स्थानिक नेते आणि नगरसेवक शिंदे गटात सहभागी होत आहेत. नवी मुंबईनंतर शुक्रवारी कल्याण- डोंबिवलीमधील नगरसेवकही शिंदे गटात सहभागी झाले. त्यामुळे आता पक्षाकडूनही कडक निर्णय घेण्यात येत असून, नवी मुंबईतील शिवसेना नेत्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
विजय चौगुले, विजय नहाटा या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. गुरुवारी या दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला होता. विजय चौगुले हे महानगरपालिकचे माजी विरोधी पक्षनेते आहेत. विजय नहाटा हे राज्य पर्यावरण समितीचे अध्यक्ष आहेत. या दोघांनी पक्षविरोधी कारवाया केल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे समोर आले आहे.
( हेही वाचा: आम्हाला संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, आज त्यांच्याकडे ना चिन्ह ना पक्ष; मनसेने सुनावलं )
खातेवाटपावर होणार चर्चा
सत्तांतरानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौ-यावर गेले आहेत. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. आता शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रपती तसेच पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. या बैठकीत खातेवाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community