नवनीत-रवी राणांच्या खटल्यातील सरकारी वकिलाला हटवले; उद्धव ठाकरेंनी केली होती नियुक्ती

139

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याच्या वादाप्रकरणी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला होता. राणा दाम्पत्याविरोधातील या प्रकरणात उद्धव ठाकरे यांनी प्रदीप घरत यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, या खटल्यातून प्रदीप घरत यांना दूर करण्याचा निर्णय विद्यमान राज्य सरकारने घेतला आहे.

( हेही वाचा : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी टीम इंडियाला धक्का! कसोटी संघातून हे ३ दिग्गज खेळाडू बाहेर )

राणा दाम्पत्याने प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. याप्रकरणी झालेल्या सुनावणीच्या वेळी घरत यांची या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून केलेली नियुक्ती सरकारने रद्द केल्याची माहिती तपास अधिकारी संदीप पाटील यांनी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांना दिली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

प्रदीप घरत यांनी लढवलेले महत्त्वाचे खटले

  • कोट्यवधी रुपयांच्या तेलगी स्टँम्प घोटाळ्यातही घरत यांनी सीबीआयचे वकील म्हणून युक्तीवाद केला. आणि याच प्रकरणात अब्दूल करीम तेलगीला जन्मठेपेची शिक्षा झाली.
  • महाराष्ट्राच्या न्यायालयीन इतिहासात घरत यांनीच पहिल्यांदा व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे पुरावे गोळा केले होते. घरत यांनी आतापर्यंत जवळपास ३० हायप्रोफाईल प्रकरणं हाताळली आहेत. यापैकी तब्बल २५ प्रकरणात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली.
  • महाविकास आघाडी सरकारच्या काळातही अनेक हायप्रोफाईल खटले घरत यांच्याकडे देण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपा नेत्यांविरोधात ज्या केसेस दाखल झाल्या, त्या सर्व प्रकरणांत घरत यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
  • वकील गुणरत्न सदावर्तेंना अटक झाली आणि पोलीस कोठडी झाली त्या सिल्वर ओक प्रकरणातही घरतच सरकारी वकील आहेत.
  • सिंधुदुर्गमध्ये नितेश राणेंना अटक आणि कोठडी झाली, ते प्रकरणही घरत यांनीच हाताळले होते. प्रवीण दरेकरांविरोधातले मजूर प्रकरण असो की सोमय्या प्रकरण; घरत यांनी महाविकास आघाडी सरकारची बाजू मांडली होती.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.