मुख्यमंत्री पदावरुन भाजपने आपल्या पाठीदत खंजीर खुपसल्याचा आरोप सातत्याने उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात येत आहे. पण आता यावरुनच खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. बेईमानी आणि पाठीत खंजीर खुपसण्याचे काम उद्धव ठाकरे यांनीच केले असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.
शब्द दिलाच नसेल तर पाळणार कसा?
उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात येणा-या या आरोपांत काहीही तथ्य नाही. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून कायमंच देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाचा उल्लेख मुख्यमंत्री पदासाठी करण्यात येत होता. त्यावेळी उद्धव ठाकरे झोपले होते का? जर भाजपला पाठीत खंजीर खुपसायचा असता तर त्यांनी बिहारमध्ये नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केलेच नसते. त्यामुळे उद्धव ठाकरेंना जर शब्दच दिला नसेल तर तो पाळणार कसा, असा सवाल नवनीत राणा यांनी केला आहे.
(हेही वाचाः दिल्ली दौरा आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं)
साधेपणाचा आव आणून काही होत नाही
नितीश कुमार यांना बिहारच्या विधानसभेत भाजपपेक्षा कमी जागा असताना सुद्धा भाजपने कुमार यांनाच बिहारचे मुख्यमंत्री केले. जर शब्द पाळायचा नसता तर भाजपने तो बिहारमध्ये देखील पाळला नसता. त्यामुळे जर बेईमानी आणि पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं असेल तर ते उद्धव ठाकरे यांनीच केलं आहे. आता साधेपणाचा आव आणून काही होत नाही. तुमची बेईमानी संपूर्ण देशाने पाहिली आहे, अशी टीका नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.