नवनीत राणा प्रकरणः राज्याचे मुख्य सचिव आणि मुंबई पोलिस महासंचालकांना दिल्लीत बोलावले

141

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या कारवाईवरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर खासदार नवनीत राणा यांच्याकडून लोकसभेच्या हक्कभंग समितीत या कारवाई विरोधात तक्रार करण्यात आली होती. आता या समितीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. राज्याचे मुख्य सचिव आणि मुंबईचे पोलिस महासंचालक यांना आता दिल्लीत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

(हेही वाचाः आर्यनला क्लीन चिट, आता वानखेडेंवर कारवाई करण्याचे केंद्राचे आदेश)

15 जून रोजी हजर राहण्याचे आदेश

मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी राणा दाम्पत्य हे मुंबईत दाखल झाले होते. या मुद्द्यावरुन शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. त्यानंतर राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली. यावेळी कोठडीत आपल्याला अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेच्या हक्कभंग समितीकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत लोकसभेच्या विशेषाधिकार समितीने राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच मुंबई पोलिस महासंचालक संजय पांडे यांना या समितीपुढे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या दोघांनाही आता 15 जून रोजी समितीसमोर हजर राहावे लागणार आहे.

(हेही वाचाः अनिल देशमुखांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल)

याच संदर्भात नवनीत राणा यांची साक्ष या समितीकडून 23 मे रोजी नोंदवण्यात आली होती. यामध्ये त्यांनी ज्या अधिकारी आणि राजकीय नेत्यांवर आरोप केले होते त्यांना आता चौकशीसाठी या समितीपुढे हजर राहावे लागणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.