योगींसमोर Navneet Rana यांचा अकबरुद्दीन ओवैसींवर पलटवार

88

राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Assembly 2024) प्रचाराच्या तोफा धडाडत असून पुन्हा एकदा हिंदू-मुस्लीम (Hindu-Muslim) मुद्दा ऐन निवडणुकीत समोर आला आहे. तर, देशपातळीवरील नेतेही महाराष्ट्रात प्रचाराला येत आहेत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi adityanath) यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावतीमध्ये भाजपा उमेदवारांसाठी प्रचारसभा झाली असून, भाजपा नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांनी येथील व्यासपीठावरुन पुन्हा एकदा एमआयएमचे नेते आणि आमदार अकबरुद्दीन ओवैसींवर (Akbaruddin Owaisi) पलटवार केला आहे. (Navneet Rana)

अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा 15 मिनिटांचा पुर्नउच्चार केला. ओवैसी यांनी प्रचाराच्या त्यांच्या पहिल्या भाषणात वेळेचा उल्लेख करताना ते म्हणाले, 10 वाजताची वेळ आहे. आता 9.45 वाजतायत. अजून 15 मिनिट उरले आहेत. सभेला आलेल्या लोकांना ते म्हणाले, अरे भाई… 15 मिनिट उरले आहेत. संयम ठेवा. ना मी त्यांचा पिच्छा सोडणार ना तो माझा सोडणार… चल रही है मगर क्या गूंज है.” असं अकबरुद्दीन म्हणाले होते. त्यावरुन, नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पलटवार केला आहे. भाजपा (BJP) आणि शिवसेना हे हिंदुत्ववादी पक्ष आहेत. भाजपाची विचारधारा असणाऱ्या शिवसेनेचे दोन तुकडे झाले.

(हेही पाहा – Rahul Gandhi यांच्या हातातील लाल पुस्तकात फक्त कोरी पाने; भाजपा म्हणते, संविधान सिर्फ बहाना है, लाल पुस्तक को बढ़ाना है!)

काय म्हणाले होते अकबरुद्दीन ओवैसी?

भारत हा देश हा जितका टिळा लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढी असणाऱ्या लोकांचाही आहे, असे वक्तव्य एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी केले. भाजपा आणि शिवसेना हे हिंदुत्ववादी पक्ष आहेत. असे विधान अकबरुद्दीन ओवैसी यांनी केले होते.  

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.