अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावरुन सुरू असलेल्या वादावर भाजपा उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) येत आहेत. मैदानासाठी पहिला विनंती अर्ज केला होता. राजकीय मतदान होईपर्यंत असे वाद होत असतात. आपल्या पक्षाचा मोठा नेता त्या क्षेत्रात येतोय, त्यांच्या पक्षाचा मोठा नेता असता, मैदानाची मागणी केली असती, तर मैदान दिलं असतं. तेवढी परिपक्वता दाखवली पाहिजे” असं नवनीत राणा (Navneet Rana) म्हणाल्या.
राहुल गांधीची सभा होतेय, त्याचा मला अभिमान वाटतो
अमरावतीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची सभा होत आहे. त्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर नवनीत राणा (Navneet Rana) म्हणाल्या की, “राहुल गांधीची सभा अमरावतीत होतेय, त्याचा मला अभिमान वाटतो. पाचवर्ष ज्या पद्धतीने काम केलं, जनतेची सेवा केली, त्यामुळे देशातील नेत्यांना नवनीन राणाला पराभूत करण्यासाठी इथे याव लागतय. याचा अभिमान वाटतो. माझी अमरावती कशी आहे? हे त्यांनी पाहाव.” (Navneet Rana)
मला जास्त विचार करण्याची गरज नाही
पैशाच आमिष दिल्याचा आरोप बच्चू कडू यांनी तुमच्यावर केला. त्यावरही नवनीत राणा (Navneet Rana) यांनी उत्तर दिलं. “बच्चू भाऊ माझ्यापेक्षा खूप मोठे, सिनिअर आहेत. त्यांचा अनुभव ते जाहीर करतायत. जास्त काही बोलणार नाही. माझा लक्ष्य माझा मतदारसंघ आहे.” असं नवनीत राणा म्हणाल्या. प्रतिसाद कसा मिळतोय? त्यावर त्यांनी सांगितलं की, “देशामध्ये मोदींची हवा आहे. अमरावतीकर महिला, जनता माझ्या पाठिशी आहे. मला जास्त विचार करण्याची गरज नाही, मोदीजींची हवा होती आणि राहणार.” (Navneet Rana)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community