नवनीत राणांप्रकरणी लीलावती रुग्णालयाकडून गुन्हा दाखल

148

नवनीत राणा यांच्या एमआरआय चाचणीच्या वेळी जे फोटो व्हायरल झाले, याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात लीलावती रुग्णालय प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. निष्काळजीपणा आणि नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाचे सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केला आहे.

सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल 

नवनीत राणा यांची एमआयआर चाचणी करतानाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले, तेव्हा हा विषय चर्चेला आला होता. त्यानंतर माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि आमदार मनीषा कायंदे यांनी थेट लीलावती रुग्णालयात जाऊन रुग्णालय प्रशासनाला या प्रकरणी चांगलाच जाब विचारला होता. तसेच त्यांनी तेथील डॉक्टरांनाही खडसावले होते. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यातही धाव घेतली होती. परंतु आता लीलावती रुग्णालय प्रशासनाने अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये कलम ४४८ तसेच कलम ६६६ अर्थात एखाद्याच्या जीवितास धोका निर्माण होईल असे निष्काळजीपणाचे कृत्य करणे यासाठी हा गुन्हा दाखल केला जातो. रुग्णालयाचा सुरक्षा रक्षक अमित गौड यांनी केलेल्या तक्रारनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनीत राणा यांच्यासोबत असलेली पांढरा शर्ट घातलेली व्यक्ती आणि एक सुरक्षा रक्षक यांनी हे फोटो काढून ते व्हायरल केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

(हेही वाचा उद्धव ठाकरेंची हिटलरशाही! ब्रिटिशकालीन कायद्यांवर राज्य चालवतात! नवनीत राणांचा आरोप )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.