न्यायालयानंतर आता महापालिकेची राणा दाम्पत्याला नोटीस 

हनुमान चालीसावरून राणा दाम्पत्याना कारागृहात जावे लागल्यानंतर आता त्यांना मुंबई महापालिकेने नोटीस पाठवणार आहे. राणा दाम्पत्याने खार येथील त्यांच्या घराच्या बांधकामामध्ये नियमांचे उल्लंघन केले म्हणून महापालिका आता त्यांना नोटीस पाठवणार आहे. त्यामुळे आता राणा दाम्पत्याच्या मागे महापालिकेचा ससेमिरा लागणार आहे. राणा दाम्पत्याना जामीन मंजूर करताना न्यायालयाने ज्या अटी शर्थी घालून दिल्या होत्या. त्यांचे उल्लंघन केल्यामुळे राज्य सरकारने राणा दाम्पत्याच्या विरोधात न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे न्यायालयाने राणा दाम्पत्याला नोटीस पाठवली असताना पाठोपाठ आता महापालिकाही नोटीस पाठवणार आहे.

राणा दाम्पत्याला तोडावे लागणार बांधकाम

सोमवारी, ९ मे २०२२ रोजी महापालिकेच्या पथकाने राणा दाम्पत्याच्या खार येथील घराची पाहणी केली. त्यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या घराच्या मंजूर आराखड्याचे उल्लंघन करून बांधकाम करण्यात आले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता महापालिका या राणा दाम्पत्याला नोटीस पाठवणार आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याला  मंजूर आराखड्याच्या व्यतिरिक्त केलेले बंधक तोडावे लागणार आहे. अशा प्रकारे सध्या दिल्लीत असलेल्या राणा दाम्पत्याच्या मागे महापालिकेचा ससेमिरा सुरु होणार आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या अडचण वाढ होणार आहे.

(हेही वाचा राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ; न्यायालयाकडून नोटीस जारी)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here