Sanjay Raut ED Raid : पापाचा घडा भरला की फुटतोच, नवनीत राणांचा राऊतांवर हल्लाबोल

112

संजय राऊत यांच्या घरावर रविवारी सकाळी ईडीने धाड टाकली आहे, ईडीच्या कारवाईवर राज्यातील अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास आता सुरूवात झालेली आहे, या सर्व प्रकरणावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

( हेही वाचा : मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, DNA जुळला नाही तरी बलात्काऱ्याला होणार शिक्षा)

पापाचा घडा भरला की फुटतोच

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, पापाचा घडा भरला की फुटतोच संजय राऊत हे २० ते २५ कंपनीत भागीदार असल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत असा गंभीर आरोप राणांनी केला आहे. तसेच त्यांना अटक होणार..ही कारवाई यापूर्वीच व्हायला पाहिजे हवी होती, असेही त्यांनी सांगितले.

भाजपचा काहीही संबंध नाही

तसेच यावर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांची चौकशी ईडी मार्फत सुरू आहे. ईडी ही स्वतंत्र यंत्रणा आहे, याचा भाजपचा काहीही संबंध नाही जे कोणी शिवसेनेचे नेते भाजपवर आरोप करत असतील ते चुकीचे आहे त्यांच्या आरोपांचे मी खंडन करतो असे भागवत कराड म्हणाले.

दरम्यान, संजय राऊत यांच्या घरावर ईडी पथक दाखल झाल्यावर आता शिवसैनिक मोठ्या प्रमाणात राऊतांच्या घराबाहेर जमून आंदोलन, घोषणाबाजी करत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.