नवनीत राणांचे गॅंगस्टरशी संबंध! संजय राऊतांचा गंभीर आरोप 

121
सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या खासदार नवनीत राणा आता महाविकास आघाडी सरकारचे लक्ष्य बनल्या आहेत. त्यामुळेच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप केला. त्याचे दाऊद गँगशी संबंध असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी काय म्हटले? 

राणा यांनी दाऊद गँगशी संबंधीत आणि ईडीने ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून लाखो रुपये घेतले होते, असा आरोप केला आहे. याचे फोटोसह ट्विट राऊत यांनी केल्याने खळबळ उडाली. नवनीत राणा यांनी युसुफ लकडावाला याच्याकडून ८० लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचे त्यांनी दिलेल्या अॅफिडेविटवर नमूद आहे. युसुफ लकडावाला याचा काही दिवसांपूर्वीच तुरुंगात मृत्यू झाला. याच लकडावालाला ईडीने पैशांची अफरातफर आणि दाऊद गँगशी संबंध असल्याप्रकरणी अटक केली होती, असे ट्विट राऊतांनी केले.

पंतप्रधान कार्यालय, ईडी आणि फडणवीसांना ट्विट 

याचबरोबर ईडीला प्रश्न विचारताना ईडी यामध्ये तपास करणार आहे का? हा देशाच्या सुरक्षेचा विषय आहे, असे म्हणत पंतप्रधान कार्यालय, ईडी आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅग करण्यात आले आहे. यामुळे आता ईडी यावर कारवाई करणार का, नाही केल्यास शिवसेना कोणते पाऊल उचलणार हे येत्या काही दिवसांत समजणार आहे. मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आणि फायनान्सर युसूफ लकडावालाचा (७६) ऑर्थर रोड कारागृहात याचा सप्टेंबर २०२१ मध्ये ऑर्थर रोड तुरुंगात मृत्यू झाला होता. मनी लाँड्रिंगसह पैशाच्या अफरातफरी प्रकरणात ईडीने त्याला अटक केली होती. २०१९ मध्ये जमीन खरेदीप्रकरणी सरकारी कागदपत्रांमध्ये फेरफार करत पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली लकडावालाला (७६) अहमदबाद आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.