अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा ओवेसींना चॅलेंज दिलं आहे. 15 सेकंदांबाबत केलेल्या वकत्व्यानंतर त्यांच्यावर हैदराबादमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी बोलताना नवनीत राणा (Navneet Rana) यांनी ओवेसींना (Asaduddin Owaisi) पुन्हा ओपन चॅलेंज दिलं आहे. खुलेआम धमकी देणाऱ्यांना उत्तर द्यावे तर लागेल ते उत्तर मी दिलेले आहे. त्यांनी उत्तर मागितलं होतं, मी उत्तर दिलेलं आहे, असं नवनीत राणा म्हणाल्या. (Navneet Rana)
ओवेसी यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे
नवनीत राणा (Navneet Rana) म्हणाल्या, “सव्वाशे कोटी लोकसंख्येत आम्ही घाबरुन बांगड्या घातल्या नाहीत. आम्ही आमचे संस्कार, संस्कृती आमच्या पाठिशी आहे. मोठे म्हणतात छोटे को दबा के रखा है तर आम्ही काय करतोय या हिंदूस्थानमध्ये, पाकिस्तान प्रेमी लोकं म्हणत असतील तर आम्ही काही बांगड्या घालून बसलेलो नाही. ओवेसी यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे, मी गुन्ह्याला घाबरत नाही. हैदराबाद मध्ये हिंदूला दाबून ठेवलं आहे, त्याच्यासाठी बोलावं लागेल. आम्ही शांत बसून समाजाला लीड करणारे लोक आहोत. कोणी आम्हाला खुलेआम धमकी देत असेल तर उत्तर द्यायला सक्षम आहे.” असं राणांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे. (Navneet Rana)
असे खूंखार आम्ही घराच्या बाहेर पाळून ठेवतो
पुढे त्या (Navneet Rana) म्हणाल्या, “माझा उद्देश स्पष्ट आहे. हिंदूस्थानमध्ये हिंदू विचारधारेला धरुन लोक राहतात त्याच्यावर जर कोण बोललं तर त्याला उत्तर द्यायला सक्षम आहे. ओवेसींच्या आव्हानाला मी मोजत नाही. ते म्हणतात छोटा खूंखार (Akabaruddin Owaisi) आहे,पण असे खूंखार आम्ही घराच्या बाहेर पाळून ठेवतो, आता काय ते समजून घ्या.” असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. (Navneet Rana)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community