“मी पराभूत झाले आहे, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, Navneet Rana नेमकं काय म्हणाल्या ?

531
“मी पराभूत झाले आहे, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, Navneet Rana नेमकं काय म्हणाल्या ?
“मी पराभूत झाले आहे, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, Navneet Rana नेमकं काय म्हणाल्या ?

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांचा पराभव झाला होता. काँग्रेसच्या बळवंत वानखडे यांनी १९ हजार ७३१ मतांनी राणा यांचा पराभव केला. या पराभवानंतर, नवनीत राणा गुरुवारी (१३ जून) पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर आल्या. यावेळी त्यांनी पराभवावर भाष्य केलं. तसेच यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लक्ष्य केलं. (Navneet Rana)

(हेही वाचा –Ajit Pawar यांच्या अडचणी वाढणार ?; Shikhar Bank Scam मधील क्लिनचीटला अण्णा हजारे देणार आव्हान)

शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी नुकतंच एक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “पुढील चार महिन्यानंतर उद्धव ठाकरे हे राज्याचे नेतृत्व करताना दिसतील.” त्यावर प्रतिक्रिया देताना नवनीत राणा (Navneet Rana) म्हणाल्या, “ते स्पष्ट शब्दांत म्हणाले होते की आम्ही शपथ घेऊ आणि नरेंद्र मोदी यांना त्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देऊ. त्यावर मी एवढंच म्हणेन की दिवसा स्वप्न बघणाऱ्या उद्धव ठाकरेंना माहिती नाही की आम्ही महाराष्ट्रात किती काम केलं आहे. येत्या काळात महाराष्ट्रातील जनता आम्हालाच प्रतिसाद देईल.” (Navneet Rana)

(हेही वाचा –PM Modi Jammu Kashmir Visit : दहशतवादाला प्रत्त्युत्तर मिळणार? पंतप्रधान थेट जम्मू-कश्मीरमध्ये जाणार)

“नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमधील मतांचं प्रमाण बघा. भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक मतं मिळाली आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या पोपटाचं ऐकण्याची आवश्यकता वाटत नाही. तसेच उद्धव ठाकरे ज्या सुरात नरेंद्र मोदींना निमंत्रण देऊ असं बोलत होते, त्यांनी आता पाहिलं असेल की खरा वाघ कोण आहे. तसेच मला वाटतं की मी आता पराभूत झाले आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आता हनुमान चालीसा पठण करायला हवी.” असं थेट आव्हानंच राणा यांनी ठाकरेंना दिलं आहे. (Navneet Rana)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.