मुंबईमधील दादर येथील हनुमानाचे मंदिर (Hanuman Temple, Dadar) पाडण्याची नोटीस, बांगलादेशमधील हिंदूवरील अत्याचार आणि तेथील इस्कॉनच्या मंदिर तोडफोडीवरून उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपावर हल्लाबोल केला होता. याचवरून नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thakeray) यांना प्रत्युत्तर देत टीका केली आहे. त्या एका माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होत्या. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार करत हल्लाबोल चढवला. (Navneet Rana)
भाजपाच्या फायर ब्रॅंड नेत्या अशी ओळख असलेल्या नवनीत राणा (Navneet Rana) यांनी शिवसेना उबाठा प्रमुख गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. जनाब उद्धव ठाकरे (Janab Uddhav Thackeray) मुख्यमंत्री होते, तेव्हा मी हनुमान चालीसा पठण करणार म्हणून मला १४ दिवस तुरुंगात ठेवण्यात आले. आमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हा, उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्त्व कुठे गेले होते? उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलायची लायकी नाही, असं म्हणत भाजपा नेत्या नवनीत राणा यांनी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
(हेही वाचा – रस्ते कॉंक्रिटीकरणाच्या कामाचा दर्जा तपासा; Ashish Shelar यांची मागणी)
तुम्ही फक्त आराम करा
तुम्ही काळजी करू नका. हिंदूंसाठी आमच्यासारखे हिंदू भक्त या मैदानात आहेत. तुम्ही फक्त आराम करा, तुम्हाला आराम करण्यासाठीच आम्ही सोडले आहे, असा टोला देखील नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. आज फक्त टोमणे द्यायचे, विरोध करायचा म्हणून आज तुम्हाला आठवले. विधानसभा निवडणुकीत त्यांना जनतेने उत्तर दिले आहे, असेही त्यांनी म्हटले.
(हेही वाचा – Vitthal Rukmini Temple Committee: वारकऱ्यांसाठी खुशखबर! आता दोन तासात होणार विठुरायाचं दर्शन! )
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी म्हटले की, मुंबईमधील दादरमध्ये रेल्वे (Dadar Railway Station) स्टेशनजवळ गेल्या ८० वर्षांपासून असलेल्या श्री.हनुमानाचे मंदिर पाडण्याची नोटीस भाजपने पाठवली आहे. विशेष बाब म्हणजे ते मंदिर एका हमालाने मेहनत करुन बांधले आहे. ती पाठवलेली नोटीस माझ्याकडे आहे. त्या नोटीसीमध्ये लिहिलंय की, तुम्ही रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण केलं आहे, ८० वर्षापूर्वीचं मंदिर भाजप पाडायला निघाले आहे. मग भाजपचं हिंदुत्त्व कुठे आहे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच, बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होतं आहेत. आपण बांगलादेशसोबत क्रिकेट खेळणं कितपत योग्य आहे? बांगलादेशमध्ये इस्कॉनच्या (Bangladesh Hindu Atrocities) प्रमुखाला अटक झाली, तिथे हिंदूंवर अन्याय होताय. मात्र, विश्वगुरु शांत का आहेत? नरेंद्र मोदी यावर काय करणार आहेत? तुम्ही युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं. मग केंद्र सरकार यावर काय करणार आहे? तुम्ही काय पाऊल उचलणार आहात? असे सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.