भारतीय नौसेनेच्यावतीने यावर्षीचा (Navy Day 2023) नौसेना दिवस (४ डिसेंबर) सिंधुदुर्ग किल्ला येथे भव्य – दिव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने मालवण-राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांच्या तयारीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवार २२ नोव्हेंबर रोजी आढावा घेतला.
‘शिवछत्रपती भारतीय आरमाराचे जनक आहेत. तसेच त्यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आहे, त्यामुळे हे दोन्ही कार्यक्रम आपल्यासाठी गौरवास्पद असल्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व यंत्रणांनी या कार्यक्रमांचे (Navy Day 2023) समन्वयाने नियोजन करण्याचे निर्देश दिले.
(हेही वाचा – NCP Crisis : ‘हे’ नेते वगळता राष्ट्रवादीच्या अन्य खासदारांचे सदस्यत्व रद्द करावे)
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे भारतीय आरमार उभारणीतील योगदान लक्षात घेऊन (Navy Day 2023) हा दिवस सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार यंदाचा नौसेना दिवस सिंधुदुर्ग येथे साजरा करण्यात येत आहे. नौसेना दलाने (Navy Day 2023) या कार्यक्रमासाठी विविध जलदुर्गांच्या पाहणीअंती सिंधुदुर्ग किल्ला आणि परिसराची निवड केली आहे.
सिंधुदुर्गच्या समुद्र किनारी (Navy Day 2023) राजकोट येथे शिवाजी महाराज यांचा ४३ फूट पुतळा उभारण्यात आला आहे. तसेच शिवछत्रपतींच्या दैदिप्यमान जीवनकार्याचा आढावा घेणारे कलादालन साकारण्यात आले आहे. नौसेना दिवस कार्यक्रमात नौसेनेच्या विविध युद्ध नौका, लढाऊ विमाने सहभागी होणार आहेत. तारकर्ली आणि मालवण समुद्र किनारी यानिमित्ताने विविध कार्यक्रम, उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. विदेशातील नौसेनेचे वरिष्ठ अधिकारी तसेच देश-विदेशातील मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. (Navy Day 2023)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community