आता मलिकांच्या निशाण्यावर शिवसेना?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भाजप-शिवसेना युती सरकारवर बनावट नोटांचे रॅकेट चालवल्याचा आरोप केला आहे. केंद्र सरकारने आपल्या कार्यकाळात लागू केलेल्या नोटाबंदीचा संदर्भ देत त्यांनी ‘त्या’ काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे रॅकेट चालवल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे शिवसेना प्रणित महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या निशाण्यावर शिवसेनाही असल्याचे सांगितले जात आहे.

आघाडी सरकारमध्ये सर्व कामांची जबाबदारी त्या संपूर्ण सरकारची असते. मात्र, या आरोपांचा हायड्रोजन बॉम्बचा स्फोट करणाऱ्या नवाब मलिक यांना याची माहिती नाही, त्यांनी नोटाबंदीच्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांच्या आशीर्वादानेच बनावट नोटांचे रॅकेट सुरू असल्याचा आरोप केला आहे. फडणवीस हे भाजप-शिवसेना युती सरकारचे प्रमुख होते. यामुळे आता नवाब मलिकचा बॉम्ब शिवसेनेला इजा झाल्यास यात कोणतेच नवल नाही.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज रॅकेटमध्ये अटक केल्यानंतर नवाब मलिक यांनी एकापाठोपाठ एक आरोप करायला सुरुवात केली आहे, तर अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. नवाब मलिक यांनी त्यांचा जावई समीर खान याच्या आरोपावरून अटक केल्याचा मुद्दाही उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणामध्ये नवाब मलिक यांनी नार्कोटिक कंट्रोल ब्युरोच्या कारवाया, विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर केलेले गंभीर आरोप, वानखेडे यांच्या जातीचे प्रश्न, विवाह पद्धती यासह अनेक आरोप केले आहेत. त्यात भारतीय जनता पक्षही त्यांच्या आरोपांच्या फैरी झाडत आला. जावयाच्या अटकेवरून भाजपने आपल्यावर वैयक्तिक आरोप केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

(हेही वाचा -बॉम्बची भाषा करणारे लवंगीसुद्धा लावू शकले नाहीत, शेलारांचा घणाघात)

असा केला मलिकांनी आरोप

देशभरात ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी घोषणा करण्यात आली. भाजपा आणि शिवसेनेची युती असताना पंतप्रधान मोदी यांनी देशातील काळा पैसा आणि बनावट नोटांचा साठा नष्ट करण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरातील विविध ठिकाणी बनावट नोटा सापडत होत्या. मात्र, महाराष्ट्रात संपूर्ण वर्षभर एकदाही बनावट नोटा सापडल्या नाहीत. कारण, या सगळ्या रॅकेटला देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद होता, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हटले. दरम्यान, बुधवारी पत्रकार परिषदेत घेत मलिकांनी फडणवीसांवर गंभीर आरोप देखील केला आहे. यावेळी ते असे म्हणाले की, नोटाबंदी करण्यात आली त्यानंतर महाराष्ट्रात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीवार्दाने बनावट नोटांचे रॅकेट सुरु होते. नोटाबंदीचा निर्णय ज्यावेळी घेण्यात आला तेव्हा शिवसेना आणि भाजपाची सत्ता होती. त्यामुळे नवाब मलिकांच्या निशाण्यावर शिवसेना देखील येणार का असा सवाल आता उपस्थितीत केला जातोय. विशेष म्हणजे ज्या महाविकास आघाडी सरकारच्या सत्तेत नवाब मलिक हे देखील एक मंत्री असल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

या बनावट धंद्याला फडणवीसांचे संरक्षण

८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी झाली. तेव्हा नोटांबंदीमुळे दहशतवाद नष्ट होईल. काळापैसा बंद होईल. बनावट नोटा संपवण्यासाठी नोटाबंदी करण्यात येत आहे. नोटाबंदी नंतर संपूर्ण देशात २००० आणि ५०० च्या बनावट नोटा पकडल्या गेल्या. तामिळनाडू, पंजाबमध्ये बनावट नोटांवर कारवाई झाली. पण ८ ऑक्टोबर २०१७ पर्यंत महाराष्ट्रात एकदाही बनावट नोटा पकडल्या गेल्या नाहीत. कारण राज्यात बनावट नोटांचा धंदा सुरू होता आणि त्याला फडणवीसांच्या संरक्षण होते. हे प्रकरण दाबण्यासाठी फडणवीसांनी मदत असून बनावट नोटांचं नेक्सस दाऊद, बागंलादेश आणि पाकिस्तान पर्यंत आहे, असा दावाही त्यांनी केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here