क्रूझवरून एनसीबीने ताब्यात घेतलेल्या ११ जणांपैकी नंतर रिषभ सचदेवा, प्रतीक गाभा आणि अमीर फर्निचर या तिघांना सोडून देण्यात आले. प्रतीक गाभा, इम्रान फर्निचरवाला हे आर्यन खानचे मित्र आहेत. त्यांनीच आर्यन खान याला क्रूझवर आणले होते, त्या दोघांना का सोडण्यात आले? तसेच त्यांच्याबरोबर रिषभ सचदेवा हा भाजपचा नेता मोहित कंभोज जे सध्या मोहित भारती या नावाने ओळखले जातात, त्यांचा हा मेव्हणा आहे. त्यालाही का सोडून देण्यात आले?, असा सवाल करत भाजपच्या दिल्लीतील नेत्यांशी बोलणे झाल्यावर या तिघांना सोडून देण्यात आल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.
कोण आहे रिषभ सचदेवा?
रिषभ सचदेवा हा भारती युवा मोर्चाचा माजी अध्यक्ष आहे. तो भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंभोज जे सध्या मोहित भारती म्हणून ओळखले जातात, त्यांचा तो मेव्हणा आहे. त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला आहे.
मलिक यांच्या जावयाला एनसीबीने अटक केली, म्हणून या प्रकरणी नवाब मलिक यांना दोषी ठरवायचे आहे का? त्याच न्यायाने मलिक रिषभ हे भाजपाचे नेते मोहित कुंभोज यांचे मेव्हणे आहेत, असे सांगत कुंभोज यांना दोषी कसे ठरवू शकतात? मुळात दाखवण्यात आलेले फोटो आणि व्हिडियो हे बनावट आहेत. त्यांची सत्यात पडताळावी लागेल.
– प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते
काय आहेत आरोप?
एनसीबीने १३०० लोक असलेल्या क्रूझवर कारवाई करताना त्यातील ११ जणांना अटक केली, तशी माहिती एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनी दिली होती, त्यानंतर मात्र त्यातील केवळ ८ जणांना अटक करण्यात आली, त्यांच्यावर केसेस दाखल करण्यात आले. कारण त्यातून रिषभ सचदेवा, प्रतीक गाभा आणि अमीर फर्निचरवाला या तिघांना सोडून देण्यात आले. त्याआधी रिषभ सचदेवा याचे वडील आणि काका क्रूझवर आले. त्यांच्या फोनवरून समीर वानखेडे यांचे दिल्लीतील भाजपाच्या नेत्यांशी बोलणे झाले, त्यानंतर रिषभ याला सोडून देण्यात आले. तसेच प्रतीक गाभा, इम्रान फर्निचरवाला हे आर्यन खानचे मित्र आहेत. त्यांनीच आर्यन खान याला क्रूझवर आणले होते अशा प्रकारे सेलिब्रेटींना क्रूझवर आणणे, त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करणे हा पूर्वनियोजित कट होता, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.
काय केली मागणी?
या सर्व प्रकरणी एनसीबीने खुलासा करावा, तसेच महाराष्ट्र पोलिस आणि राज्याच्या अमली पदार्थ विरोधी पथक यांनी याची चौकशी करावी. या प्रकरणातील रिषभचे नातेवाईक आणि समीर वानखेडे यांचे फोन डिटेल्स घ्यावेत, अशी मागणी मलिक यांनी केली. दरम्यान जनतेचा दरबार हा सर्वात मोठा असतो म्हणून आपण ही माहिती पत्रकार परिषदेत देत आहे. ज्यांना त्यांच्यावर अन्याय झाला आहे असे वाटत असेल त्यांनी हे विषय घेऊन न्यायालयात जावे, असेही मलिक म्हणाले.
Join Our WhatsApp Community