मनी लॉउडरिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते, मंत्री नवाब मलिक यांना ईडीने बुधवारी पहाटे ताब्यात घेतले, त्यानंतर ८ तास चौकशी केल्यानंतर मलिक यांना अटक करण्यात आली.
आठ तासांच्या चौकशीनंतर मलिक जेव्हा ईडीच्या कार्यालयाबाहेर आले, तेव्हा त्यांना थेट जेजे रुग्णालयात वैद्यकीय चौकशीसाठी नेण्यात आले. त्यावेळी मलिक यांनी हात उंचावत ‘झुकेंगे नही..’ असे जोरदार म्हणत माध्यमांकडे येत होते. मात्र त्याचवेळी त्यांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा जवानांनी त्यांना थेट गाडीत बसवून पुढे जेजे रुग्णालयात नेण्यात आले.
‘या’ आरोपांखाली नवाब मलिक ईडीच्या रडारवर
- 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपीकडून मलिकांचे पुत्र फराज मलिकांकडून जमीन खरेदीचा आरोप
- कुर्ल्यातील मोक्याची 3 एकर जागा मलिकांचे पुत्र फराज मलिकांनी खरेदी केल्या
- 30 लाखांतील जमीन खरेदीपैकी 20 लाखांचं पेमेंट केल्याचा मलिकांवर आरोप
- मलिक कुटुंबीयांच्या सॉलिडस कंपनीनं 2005 मध्ये शहावली आणि सलीम पटेलांकडून व्यवहार केल्याचा आरोप आहे
- 2005 मध्ये कुर्ल्यातील जमिनीचा भाव 2053 रु. स्क्वेअर फूट होता मात्र खरेदी 25रु. स्वेअर फुटांनी केली.
- जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी सलीम पटेलच्या नावावर, विक्री सरदार शहा वलीच्या नावावर तर कागदपत्रावरील सही फराज मलिक यांची आहे.
(हेही वाचा ‘या’ प्रमुख आरोपांखाली नवाब मलिकांची होतेय चौकशी)
Join Our WhatsApp Community