Nawab Malik विधानसभा स्वतःच्या बालेकिल्ल्यातून लढणार नाही, मग कुठून लढणार ?

134
Nawab Malik विधानसभा स्वतःच्या बालेकिल्ल्यातून लढणार नाही, मग कुठून लढणार ?
  • प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) आपल्या बालेकिल्ल्यातून निवडणूक लढवणार नसल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. अणुशक्तीनगरमधून मुलगी सना खान यांना उतरवणार आहेत. मात्र आपल्या मतदारसंघ बदलून नवाब मलिक मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. मानखुर्द शिवाजी नगरमध्ये मलिक अबू आझमींना टक्कर देणार आहेत. अजित पवार यांना लोकसभेला मुस्लिम मतांचा फटका बसला होता. हे लक्षात घेता अजित पवार विधानसभेला मुस्लिम उमेदवार देण्यावर भर देणार आहेत. नवाब मलिक (Nawab Malik) यांनी स्वत:चा मतदारसंघ सोडून मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी चालवली आहे. पक्षानंही त्यांना त्यासाठी संमती दिल्याचं समजतं.

(हेही वाचा – Sion Koliwada मध्ये झळकले बॅनर : ‘सायन कोळीवाडा जनता का आशीर्वाद…राजेश्री राजेश शिरवडकर के साथ’)

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री असलेले नवाब मलिक (Nawab Malik) यांना दाऊदशी कनेक्शन व भूखंड घोटाळ्याच्या प्रकरणात अटक झालेली होती. अलीकडेच त्यांना जामीन मिळाला आहे. सुटकेनंतर त्यांनी अजित पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. नवाब मलिक हे सध्या अणुशक्तीनगर विधानसभेचे आमदार आहेत. हा मतदारसंघ ते आता मुलगी सना शेख हिच्यासाठी सोडणार आहेत. मलिक स्वत: अबू आसिम आझमी यांच्या विरोधात मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून लढणार आहेत.

(हेही वाचा – हरित ऊर्जा निर्मितीच्या ४७ हजार ५०० कोटीच्या सामंजस्य करारामुळे १८ हजारावर रोजगार निर्मिती- DCM Devendra Fadnavis)

मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ मुस्लिम बहुल आहे. इथं सुमारे ५८ टक्के मुस्लिम मतदार आहेत, तर मराठी, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय आणि दलिताची संख्या ४२ टक्के आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता मलिक (Nawab Malik) हे आझमी यांच्यासाठी आव्हान ठरणार असं मानलं जात आहे. नवाब मलिक देखील पूर्वाश्रमीचे समाजवादी पक्षाचेच आमदार होते. १९९९ साली समाजवादी पक्षाची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हाती बांधले होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.