नवाब मलिकांचा तुरूंगातील मुक्काम वाढला; ‘या’ कारणामुळे जामीन देण्यास न्यायालयाचा नकार

186
नवाब मलिकांचा तुरूंगातील मुक्काम वाढला; 'या' कारणामुळे जामीन देण्यास न्यायालयाचा नकार
नवाब मलिकांचा तुरूंगातील मुक्काम वाढला; 'या' कारणामुळे जामीन देण्यास न्यायालयाचा नकार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (१३ जुलै) नकार दिला. यामुळे मलिकांचा जेलचा मुक्काम लांबला आहे.

किडनीच्या आजाराने त्रस्त असून इतरही अनेक आजार असल्याचे सांगत नवाब मलिकांनी वैद्यकीय आधारावर न्यायालयाकडे जामीन मागितला होता. न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या एक सदस्यीय न्यायपीठाने वैद्यकीय कारणास्तव जामीन मागणारी मलिकांची याचिका फेटाळून लावली. मलिकांचे वकील अमित देसाई यांनी सांगितले की, “मलिक यांची प्रकृती गेल्या ८ महिन्यांपासून खालावत आहे आणि ते किडनीच्या आजाराच्या स्टेज २ ते स्टेज ३ मध्ये आहेत. मलिक यांची प्रकृती लक्षात घेत आणि त्यांना या अटींमध्ये राहू दिल्यास ते मलिकांसाठी जीवघेणे ठरू शकते”, असे सांगत त्यांनी जामिनासाठी न्यायालयाला विनंती केली होती.

(हेही वाचा – BJP : काका-पुतण्यांच्या एकजुटीसाठी भाजपचे प्रयत्न)

मलिकांवर त्यांच्या आवडत्या रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू

सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी ईडीच्या वतीने हजरी लाऊन या जामिनाला विरोध केला. त्यांनी सांगितले की, मलिक हे त्यांच्या आवडीच्या रुग्णालयात आहेत आणि वैद्यकीय उपचार घेत आहेत. १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) नोंदवलेल्या एफआयआरवर आधारित ईडीचा मलिक विरुद्धचा खटला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.