प्रकृती अस्वास्थ्य या कारणामुळे नवाब मलिक (Nawab Malik) यांना जामीन मिळाला आहे, मात्र मागील दोन दिवसांपासून ते नागपूर हिवाळी अधिवेशनात सहभाग घेत आहेत. त्यावेळी त्यांची प्रकृती उत्तम दिसत आहे. त्यामुळे आता त्यांची ऑर्थर रोड कारागृहात रवानगी असायला हवी, असे ट्विट भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी केले आहे. हे ट्विट सध्या जोरदार चर्चेला आले आहे.
Supreme Court Should Cancel मियाँ नवाब मलिक bail , as bail was given only for medical treatment not to attend assembly session in Nagpur !
कचरा सेठ को देख के लगता है तबियत एक दम First Class है और कोई इलाज की ज़रूरत नहीं है !
Immediately he should be send back to Arthur Road Jail pic.twitter.com/3W9CmzNYjN— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) December 8, 2023
काय म्हटले मोहित कंबोज?
नवाब मलिक (Nawab Malik) यांना सर्वोच्च न्यायालयाने फक्त वैद्यकीय कारणांसाठीच जामीन मंजूर केला. त्यानंतर त्यांच्यावर वेगवेगळ्या विकारांसाठी उपचार झाले त्यातून ते बरे होऊन मुंबई ते नागपूर असा प्रवास करत विधिमंडळ अधिवेशनात पोहोचले. याचा अर्थ नवाब मलिकांची तब्येत आता “क्रिटिकल” राहिलेली नाही, मग सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांचा वैद्यकीय जामीन रद्द होऊन पुन्हा ते ऑर्थर रोड तुरुंगातच दाखल व्हायला हवेत, अशी चर्चा सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजपचे मुंबईतले नेते मोहित कंबोज यांनी तर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश सोशल मीडिया हँडलवर ट्विट करून नवाब मलिक आता “फिट” झाले आहेत. त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज नाही. त्यांना ताबडतोब तुरुंगात पाठवून द्या, अशी मागणी केली आहे.
(हेही वाचा Uday Samant : सिग्नल शाळेला आर्थिक मदत पुरवण्याचे निर्देश देऊ; उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा)
अशा स्थितीत नवाब मलिक (Nawab Malik) हे वैद्यकीय जामिनावर बाहेर येऊन वैद्यकीय उपचार घेऊन बरे झाले असतील आणि ते मुंबई ते नागपूर असा प्रवास करून विधिमंडळाच्या अधिवेशनाला उपस्थित राहणे इतपत “फिट” असतील, तर त्यांची रवानगी पुन्हा तुरुंगातच केली पाहिजे, अशी मागणी मोहित कंबोज यांनी केली आहे. त्यावर अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.