- सुजित महामुलकर
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज मंगळवारी २० फेब्रुवारीला राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला (Special Session) हजेरी लावत सत्ताधारी बाकांवर अगदी शेवटच्या रांगेत बसल्याने मलिक (Nawab Malik) हे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) भाग असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. (Nawab Malik)
हिवाळी अधिवेशनात भाजप आणि अजित पवार वाद
नागपूरला डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या बसण्याच्या जागेवरून भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला होता. (Nawab Malik)
देशद्रोहाचा आरोप
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात शेजारी बसलेल्या महायुतीतील घटक पक्षाचे नेते अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर देशद्रोहाचा आरोप असल्याचा उल्लेख केला होता आणि राष्ट्रवादीतील नवाब मलिक (Nawab Malik) समावेशाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिक (Nawab Malik) यांना महायुतीत घेऊ नये, अशी विनंती केली होती. यामुळेच नवाब मलिक (Nawab Malik) यांनी हिवाळी अधिवेशनात सुरुवातीचे दोन दिवस वगळता अधिवेशनाकडे पाठ फिरवली होती. (Nawab Malik)
(हेही वाचा – Maratha Reservation : गुणरत्न सदावर्ते अॅक्शन मोडमध्ये;आरक्षणाला हायकोर्टात आव्हान देणार)
सध्या जामिनावर तुरुंगातून बाहेर
गॅंगस्टर दाऊदशी संबंधित सलीम पटेल आणि हसीना पारकर यांच्या गोवावाला कंपाउंडच्या जमीन व्यवहारात अपहार केल्याचा आरोप नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर आहे. नवाब मलिक (Nawab Malik) सध्या जामिनावर तुरुंगातून बाहेर असून आज त्यांनी विशेष अधिवेशनात हजेरी लावली. (Nawab Malik)
सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन
सभागृहातील कामकाजाला राष्ट्रगीत आणि महाराष्ट्रगीताने सुरुवात झाली. त्यावेळी सत्ताधारी भाजप आमदारांच्या मागे शेवटच्या रांगेत राष्ट्रगीत आणि महाराष्ट्रगीत संपेपर्यंत पूर्णवेळ उभे राहिले आणि त्यानंतर सभागृहातून निघून गेले. नवाब मलिक (Nawab Malik) हजेरीमुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून येत्या सोमवारी २६ फेब्रुवारीपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. (Nawab Malik)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community