नवाब मलिकांना ड्रग्ज विक्री करणाऱ्यांची चिंता!

नवाब मलीक यांना बिनबुडाचे आरोप करण्याची सवय झाली आहे. भंगाराचा व्यवसाय करता करता त्यांनी आपली मतीही भंगारात विकली आहे, असे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.

110

नवाब मलिकांना मुळात आर्यन शाहरूख खानची चिंता आहे की त्यांना ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळक्यांची चिंता आहे? असे तर नाही ना की NCB ने सखोल तपास केल्यास तुमचे ड्रग्स टोळक्यांशी असणारे लागेबांधे उघड होणार आहेत? या भितीपोटी तर तुम्हाला झोप लागत नाही ना?, असा आरोप भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला.

भंगाराचा व्यवसाय करतांना मतीही भंगारात विकली

नवाब मलीक यांना बिनबुडाचे आरोप करण्याची सवय झाली आहे. भंगाराचा व्यवसाय करता करता त्यांनी आपली मतीही भंगारात विकली आहे. त्या क्रूझवर १३०० लोक प्रवास करत होते. त्यात तुमचेही काही जवळचे होते. आणि तपासानंतर ज्यांच्यावरती गुन्हा सिद्ध झाला. त्यांनाच फक्त एनसीबीने अटक केली. उर्वरीत लोकांना एनसीबीने सोडलेले आहे, असे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.

(हेही वाचा : क्रूझवरून सोडून दिलेला ‘तो’ मेव्हणा मोहित भारती यांचा!)

जावयाला अटक झाली तेव्हा गप्प का होता?

मुळात तुमचे वसुली सरकार हे वसुलीत गुंग असल्यामुळे एनसीबी असो कि दिल्लीतली एटीएस यांनाच कारवाई करावी लागत आहे. तुमच्या स्वत:च्या जावयाला ड्रग्स केसमध्ये अटक झाली असताना तेव्हा तुम्ही कशासाठी गप्प बसले होता?, असा प्रश्न आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.