सध्या नवाब मलिक एकामागोमाग एक आरोप करत आहेत. आरोप करताना फोटो, व्हिडिओ जाहीर करतात, असाच एक आरोप त्यानी भाजपच्या ठाण्यातील आमदारावर केला. जो किरण गोसावी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे, त्याच्याशी त्या आमदाराचे व्यावसायिक संबंध असून हिवाळी अधिवेशनात त्याचा गौप्यस्फोट करणार असल्याचे मलिक यांनी जाहीर केले, मात्र त्याआधीच आमदार निरंजन डावखरे यांनी ‘तो’ किरण गोसावी कोण आहे, त्यालाच समोर आणून मलिकांचा आरोपातील हवाच काढून टाकली.
आर्यन खानच्या अटकेच्या निमित्ताने भाजपावर फुसके बार करणारे मंत्री नवाब मलिक यांच्यासह तथाकथीत समाजमाध्यमी तोंडघशी पडले. पर्सनल अजेंडा' राबवून मित्र परिवाराचा गांजा पिणाऱ्यांची अवस्था `खोदा पहाड निकला चुहा' अशी झाली. `ट्र्यू पॅथलॅब'च्या किरण गोसावींच्या बदनामीची
भरपाई कोण करणार? pic.twitter.com/OUMpFA2Ktc— Niranjan Davkhare (@niranjandtweets) October 30, 2021
भाजपच्या एका नेत्याच्या पत्नीची किरण गोसावीच्या कंपनीत भागीदारी असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. मात्र मलिक यांचा हा दावा खोटा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाण्यातील एका किरण गोसावीने भाजप नेत्याच्या पत्नीसोबत एका कंपनीत माझा सहभाग आहे. पण तो किरण गोसावी मी नव्हेच, असा दावा या किरण गोसावीने केल्याने या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.
(हेही वाचा : …म्हणून संदीप खरेंनी ‘इर्शाद’चा गाशा गुंडाळला!)
मलिक तोंडावर पडले ! – निरंजन डावखरे
नवाब मलिक यांच्या आरोपानंतर भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन त्या किरण गोसावीला समोर आणले. माझे नाव किरण गोसावी आहे. माझ्या नावातील साधर्म्याने मलिकांचा गोंधळ उडाला आहे. माझीही चौकशी करण्यात आली. मी पोलिसांना सर्व पुरावे दिले आहेत, असे त्या गोसावी यांनी सांगितले. यावेळी निरंजन डावखरे यांनीही या प्रकरणावर खुलासा करत मलिक यांच्यावर टीका केली. माझी पत्नी आणि किरण गोसावी हे पार्टनर आहेत, असे राष्ट्रवादीच्या लोकांनी पसरवले. कोणतीही माहिती न घेता बोलले की कसे तोंडावर पडतो हे आता त्यांना समजले असेल. आर्यन खानच्या माध्यमातून हे लोक स्वत:चे पर्सनल अजेंडे राबवत आहेत. निलिमा डावखरे आणि किरण गोसावी हे डायरेक्टर आहेत, असे पसरवले गेले, पण आता जे माझ्या बाजुला बसलेत ते किरण गोसावी आहेत. किरण गोसावी नावाच्या दोन व्यक्ती आहेत. त्या किरण गोसावीशी आमचा कोणताही संबंध नाही. काहीतरी सुपर स्पेशल बातमी करायची म्हणून भाजपच्या विरोधात काहीतरी पसरवण्याचा प्रयत्न केला गेला, मित्र परिवाराने आपल्याला दिलेला गांजा पिऊन बोलल्यावर हीच अवस्था होते, असे निरंजन डावखरे म्हणाले.
Join Our WhatsApp Community