नितेश राणेंचे ‘म्याॅव म्याॅव’, नवाब मलिकांचे काॅकटेल चित्राद्वारे प्रत्युत्तर

135

हिवाळी अधिवेशनाच्या दुस-या दिवशी आमदार नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे विधान भवनात येत असताना, म्याॅव म्याॅव असा आवाज काढल्यावर वाद निर्माण झाला. अधिवेशनाच्या तिस-या दिवशी हा विषय विधीमंडळात चर्चेत आला. यावर एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन कोंबडा आणि मांजर यांचे काॅकटेल चित्र ट्विट करुन, राणेंची खिल्ली उडवली.

विधान परिषदेतही उमटले पडसाद

राणेंच्या या खोडसाळ वागण्याचा शुक्रवारी म्हणजेच अधिवेशनाच्या तिस-या दिवशी विधानसभेत पडसाद उमटले. शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी औचित्याच्या मुद्यावर बोलताना, सभागृहासमोर विधीमंडळाचा परिसरात, सदस्यांचे वागणे हे् नैतिकतेचे असणे आवश्यक आहे. एखाद्या सदस्याला उद्देशून, प्राण्यांचा आवाज काढणे चुकीचे आहे. याची विधानपरिषदेने दखल घेऊन, योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यावर सभापती नीलम गो-हे यांनी गृहराज्यमंत्र्यांना याची दखल घ्यायला सांगितले. त्यावर गृहराज्यमंत्र्यांनी याप्रकरणी योग्य ती माहिती घेऊन, सभागृहात सादर करु,असे सांगितले आहे.

अशी उडवली खिल्ली

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी अधिवेशन चर्चेचा विषय ठरले, शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विधान भवनात पंतप्रधान मोदींची नक्कल केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले. त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर जाधवांनी जाहीर माफी मागितली. काॅपी- माफीच्या या नाट्यमय प्रकारानंतर नितेश राणेंची आदित्य ठाकरेंच्या एंट्रीच्या वेळची म्याॅव म्याॅव वाली नक्कल महाराष्ट्रभर गाजली, आता त्यांना प्रतिउत्तर म्हणून नवाब मलिकांनी मांजर आणि कोंबडा असे काॅकटेल चित्र शेअर करत, नितेश राणेंची खिल्ली उडवली आहे.

( हेही वाचा :चंद्रपुरात वायू आतंक! शहरातील लोकं आपली घरं सोडून निघाले )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.