मलिकांचा दुबईवरून  वानखेडेंवर  हल्ला! म्हणाले, ‘ये क्या किया तुने?’

सध्या एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक हे दुबईत आहे. मात्र तेथूनही ते एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. रविवारी मध्यरात्री त्यांनी ट्विटवर वानखेडेंच्या लग्नाचा फोटो टाकून त्यांच्यावर ते मुस्लिम असल्याचा पुन्हा एकदा आरोप केला आहे.

पहिल्या लग्नाची निमंत्रण पत्रिकाही व्हायरल

मलिक यांच्या कन्या निलोफर मलिक खान आणि सना मलिक शेख यांनी रविवारी वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाशी संबंधित विवाहाचा दाखला आणि लग्नाच्या स्वागत सोहळ्याची निमंत्रण पत्रिका पोस्ट केली होती. नवाब मलिक हे सध्या दुबई दौऱ्यावर गेले आहेत. हा त्यांचा शासकीय दौरा आहे. तिथे गेल्यावरही समीर वानखेडे यांच्यावरील त्यांचे हल्ले थांबलेले नाहीत. मलिक यांनी मध्यरात्रीनंतर ट्वीटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये समीर वानखेडे आणि एक अन्य व्यक्ती दिसत आहे. वानखेडे यांच्या निकाहच्या वेळचा हा फोटो असल्याचे दिसत आहे. मात्र त्याबाबत सविस्तर भाष्य न करता मलिक यांनी फोटोवरूनच खोचक सवाल केला आहे. ‘कबूल है, कबूल है, कबूल है…यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede ?’ असे प्रश्नार्थक ट्वीट या फोटोसह मलिक यांनी केले आहे. या फोटोवर मलिक हे सोमवारी अधिक स्पष्टीकरण देतील, अशी शक्यता असून त्यावर वानखेडे हे कोणते म्हणणे मांडतात हेसुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.

(हेही वाचा साहित्य संमेलन आणि मराठी भाषा शुद्धीकार वीर सावरकरांचा सन्मान)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here