देशमुखांच्या पाठिंब्यासाठी पुढे आला आणखी एक नेता! 

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोप गंभीर आहे, याची चौकशी होईल. या चौकशीत जे निष्पन्न होईल त्या दृष्टीने कारवाई करण्यात येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले.

अनिल देशमुख कोरोना पॉझिटिव्ह असताना त्यांना भेटल्याचा आरोप करणारे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी कटकारस्थान करुन महाविकास आघाडीला आणि गृहमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याची चौकशी होईलच व त्यादृष्टीने कारवाई देखील केली जाणार आहे. मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नाही असा पक्षाने निर्णय घेतल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

बदनामीचा प्रयत्न

मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांच्या चिठ्ठीवर जो वाद निर्माण झाला आहे त्यावर नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. परमबीर सिंग यांनी बदली झाल्यावर ही चिठ्ठी लिहिली आहे. परमबीर सिंग यांनी १७ मार्चला बदली होणार हे माहीत असताना १६ मार्चला काहीतरी प्रश्न विचारुन चॅट पुरावा तयार केला. त्या चॅटनुसार गृहमंत्री अनिल देशमुख हे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वाझेंना भेटले असा उल्लेख करण्यात आला आहे. त्याच दरम्यान अनिल देशमुख हे विदर्भाच्या दौऱ्यावर होते. त्याचवेळी त्यांना कोरोना झाला. १५ दिवस ते हॉस्पिटलमध्ये होते, नंतर २७ फेब्रुवारीपर्यंत गृह विलगीकरणात होते. २७ फेब्रुवारीला त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. असे असताना पुरावा तयार करुन कटकारस्थान करत बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

(हेही वाचाः देशमुखांची विकेट पडणार, दिलीप वळसे-पाटील गृहमंत्री होणार?)

हा आरोप गंभीर आहे याची चौकशी होईल या चौकशीत जे निष्पन्न होईल त्या दृष्टीने कारवाई करण्यात येईल, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

परमबीर यांनी घेतला गृह रक्षक विभागाचा ताबा

लेटर बॉंब टाकत थेट राज्याच्या गृहमंत्र्यांवर आरोप करणा-या आणि राज्याचे राजकीय वातावरण हादरवून सोडणा-या परमबीर सिंग यांनी नुकताच गृह खात्याच्या गृह रक्षक विभागाचा ताबा घेतला आहे. मुंबई पोलिस आयुक्त पदावरुन पायउतार झाल्यानंतर त्यांची गृह रक्षक विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here