नवाब मलिकांनी कोणता केला नवा दावा? वाचा…

फक्त व्हॉटस्ॲप चॅट आधारावर त्यांना आरोपी ठरवले जाते आहे. त्यांच्या केसेस खोट्या असल्यानेच ते नमुने घेत नसल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

90

भाजप, एनसीबी आणि काही गुन्हेगार मिळून या मुंबईत दहशत माजवत आहे. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी याचा वापर कसा करत आहे, त्याचे पुरावे पुढच्या आठवड्यात देणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

वानखेडेंचे मोबाईल व व्हॉटस्ॲप चॅट चेक करा

इलेक्ट्रॉनिक पुराव्यावर एनसीबी चालत आहे. समीर वानखेडे यांचा मोबाईल व व्हॉटस्ॲप चॅट चेक करा. फोन रेकॉर्डिंग जर रिलीज झाली, तर सर्व केस कशा बोगस आहेत आणि मुंबईत जो फर्जीवाडा केलाय तो समोर येईल, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

(हेही वाचा : केंद्रीय तपास यंत्रणांमुळे सरकार बेजार! मुख्यमंत्र्यांना भेटले शरद पवार)

व्हॉटस्ॲप चॅटवर ठरवले जातात आरोपी

पूर्वी रेव्ह पार्टी जेव्हा – जेव्हा झाल्या आहेत, तेव्हा त्या वेळी जे संशयित सापडत होते, त्यांचे रक्त व लघवी नमुन्यासाठी घेऊन संशयितांना सोडले जायचे. त्यानंतर त्यांचा नमुना पॉझिटिव्ह आल्यावर त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले जात होते. मात्र या वर्षभरात एनसीबीने ज्यांच्यावर आरोप लावले किंवा ज्यांना अटक केली त्यांचे कोणतेही रक्त किंवा लघवीचे नमुने घेतलेले नाही. ज्या आरोपींना ताब्यात घेतले जात आहे, त्यांचे नमुने पॉझिटिव्ह येणार नसल्याने त्यांची नमुना टेस्ट केली जात नाही. फक्त व्हॉटस्ॲप चॅट आधारावर त्यांना आरोपी ठरवले जाते आहे. त्यांच्या केसेस खोट्या असल्यानेच ते नमुने घेत नसल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

आर्यन खानच्या जामिन अर्जावरून आरोप 

आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळण्यावर माझा कुठलाही आक्षेप नाही. ज्या पद्धतीने युक्तीवाद करण्यात आला…महानगर न्यायदंडाधिका-यांपासून एनडीपीएस विशेष न्यायालयापर्यंत युक्तीवाद वारंवार बदलत आले आहेत. नवनवीन विषय आणले जात आहेत. काही लोकांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकांना जामीन होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पब्लिसिटीसाठी लोकांना अडकवण्याचे काम करण्याचे काम सुरू आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.