मलिकांकडून अनिल बोंडेंची कथित ऑडिओक्लिप व्हायरल! काय केला आरोप?

एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्वीट करून अमरावतीतील भाजप नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे यांच्यावर घणाघाती हल्ला केला. त्यात त्यांना बोंडेंच्या आवाजातील कथित ऑडिओक्लिप आहे. त्यामध्ये ‘दंगली भडकावण्याचे काम भाजप नव्हे तर सेक्युलर पक्ष करतात’, असे वक्तव्य बोंडेंनी केले. त्यावर बोंडे खोटे बोलतात, अमरावतीत उसळलेल्या दंगल प्रकरणी भाजप नेत्यांनी पैसा पुरवून हिंसक कारवाया घडवून आणल्या, असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे.

काय आहे ऑडिओ क्लिपमध्ये?

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या ट्विटमध्ये अनिल बोंडे यांच्या आवाजातील एक ऑडिओ क्लिप समाविष्ट आहे. यात अनिल बोंडे कसे खोटे बोलतात, ते पहा, असे मलिक यांनी म्हटले. ऑडिओ क्लिपमधील म्हटले आहे की, गोंध्रा दंगलीनंतर गुजरात किंवा अहमदाबादमध्ये दंगल झालीच नाही. त्याआधी अहमदाबादमध्ये दरवर्षी दंगल ठरलेली असायची. पण मोदी सरकार सत्तेत आल्यापासून असे कृत्य झाले नाही. राज्यात फडणवीसांचे सरकार आले, तेव्हाही दंगल झाली नाही. भाजपचे सरकार जिथे असते, तिथे दंगल घडवण्याची हिंमत कुणीही करत नाही. पण ज्या ठिकाणी सेक्युलर किंवा डाव्या विचारसरणीचे सरकार येते, त्या ठिकाणी दंगली होतात. कारण अशा हिंसक कारवाया करणाऱ्यांना नेत्यांकडून संरक्षण मिळाले. याआधीच्या पाच वर्षांच्या सरकारमध्ये कोणत्याही संवेदनशील भागात दंगे झाले नाहीत’ ही ऑडिओ क्लिप अनिल बोंडे यांची असून यात ते खोटे बोलले आहेत, असा आरोप मलिक यांनी केला आहे.

(हेही वाचा समीर वानखेडे मुस्लिमच! नोकरी सोडावी लागेल! नवाब मलिकांचा दावा)

अमरावती दंगल प्रकरणी भाजप नेत्यांना अटक

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अमरावती पोलिसांनी शहरात घडलेल्या दंगल प्रकरणी अनेक भाजप नेत्यांना अटक केली. यात माजी मंत्री अनिल बोंडे यांनाही अटक करण्यात आली होती. 17 नोव्हेंबर रोजी भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांनीही पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. मात्र हिंमत असेल तर ज्यांच्या घरात खरोखरच्या तलवारी आहेत, त्यांना अटक करून दाखवा, असे आवाहन अनिल बोंडे यांनी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना दिले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here