मनी लॉन्डरिंगच्या गुन्ह्याखाली सध्या ईडीच्या कोठडीत असलेले नवाब मलिक हे चौकशीला सहकार्य करत नाहीत, त्यामुळे आता ईडीने मलिकांच्या घरातील सदस्यांच्या चौकशीला सुरुवात केली आहे. त्यामध्ये आधी त्याचा मुलगा रडारवर आला आहे.
या आठवड्यात चौकशीला बोलावले जाऊ शकते
सक्त वसुली संचालनालयाच्या कोठडीत असलेले अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र त्यांच्या प्रकृतीबाबत ईडी खासगी डॉक्टर किंवा एम्सच्या तज्ज्ञांचा सल्ला घेण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे त्यांचा मुलगा फराज याला या आठवड्यात चौकशीसाठी बोलावण्यात येऊ शकते. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, त्याचे कुटुंबीय आणि टोळीतील सदस्यांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने नवाब मलिक यांच्यावर बुधवारी अटकेची कारवाई केली. त्यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. मात्र अटकेनंतर दोन दिवसांनीच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. येथील उपचार आणखीन काही दिवस सुरु राहणार असल्याचे समजते. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांकडून तपासाला सहकार्य मिळत नसल्याने ईडीने त्यांचा मोर्चा त्यांचा मुलगा फराजकडे वळवला आहे. लवकरच त्यांना समन्स बजावून या आठवड्यात चौकशीला बोलावले जाऊ शकते, अशी माहिती ईडी सूत्रांकडून मिळते आहे.
(हेही वाचा Russia Ukraine War : जग पुन्हा जातेय का अणु युद्धाच्या दिशेने?)
Join Our WhatsApp Community