नक्षलवाद्यांची थेट मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीला लाल शाईत जीवे मारण्याची धमकी!

111

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गडचिरोलीच्या दौऱ्यावर होते. नक्षलवाद्यांचा इलाखा असलेल्या या भागात मुख्यमंत्र्यांनी पाहणी दौरा केला होता. यावेळी राज्यातील नक्षलवाद कमी होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या विधानाला ८ दिवसदेखील होत नाही तर नक्षलवादी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष कार्य अधिकारी OSD डॅा. राहुल गेठे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. डॉ. राहुल गेठे यांना त्यांच्या घरी नक्षलवाद्यांनी लाल शाईने लिहिलेले धमकीचे पत्र मिळाले आहे. या पत्रात नक्षलवाद्यांनी डॅाक्टर राहुल गेठे यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – UPI Payment: ‘फोन पे’, ‘गुगल पे’ करताना लागणार शुल्क? काय आहेत बँकांचे नियम?)

नक्षलवाद्यांनी राहुल गेठे यांच्या सीबीडी बेलापूर येथील त्यांच्या राहत्या घराच्या पत्त्यावर हे धमकावणारे पत्र पाठवले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामे वेगाने करण्याचे निर्देश दिले आहेत. हे निर्देश दिल्यानंतर राहुल गेठे यांनी अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे नक्षलवाद्यांनी राहुल गेठे यांना लक्ष्य करत जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र त्यांच्या घरी पाठवल्याचे सांगितले जात आहे.

धमकीच्या पत्रात काय लिहिले?

जय लाल सलाम, जय किसान

एकनाथ शिंदे का ॲाफिसर डॅाक्टर राहुल गेठे बहुत उड रहा है. हमारा नुकसान गडचिरोली मे बहुत कर रहा है. हम हमारे भाईयों का बदला जलद ही लेने वाले है. उसकी मौत का एलान निकल चुका है. महाराष्ट्र सरकार को उसकी जबाबदारी जितना लेना हे ले लो.

जय नक्षलवाद

eknath shinde

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.