दिशा सालियनची केस बंद झाली नाही – नारायण राणेंचा इशारा

145
सुशांत आणि दिशावर अत्याचार करून ठार मारण्यात आले. गच्चीवरुन फेकण्यात आले. असे प्रकार यापुढे होणार नाहीत. असा प्रकार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. सुशांत आणि दिशाची केस संपली नाही. भविष्यात असे घडू नये असे शिंदे-फडणवीस सरकार प्रयत्न करेल, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना सूचक इशारा दिला आहे.
नारायण राणेंच्या जुहू येथील बंगल्यात गणपती बाप्पा विराजमान झाला आहे. यावेळी नारायण राणे म्हणाले की, आज श्रीगणेशाचे आगमन झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरात आनंदाचे वातावरण आहे. राज्यातील साडे तेरा कोटी जनता सुखी समाधानी राहावी. त्यांना सुरक्षा मिळावी. भविष्यात छत्रपतींचा महाराष्ट्र सुखी समाधानी ठेवता येईल असा कारभार सरकारकडून होईल असे नारायण राणे म्हणाले.

मुंबई महापालिकेवर भाजपची सत्ता येणार 

मुंबई महापालिका अनेक वर्ष ज्यांच्या हाती आहे त्यांनी स्वच्छ, सुंदर मुंबई बनवली नाही. बकाल मुंबई बनवली. टक्केवारीने मुंबईचे शोषण केले. विकासाच्या कामात, साफसफाईच्या कामात, नालेसफाईत टक्केवारी खाल्ली. राज्यात गणपती येण्यापूर्वी राज्यातील सत्ता गेली. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत परिवर्तन होईल. भाजपाची नक्कीच सत्ता येईल. मुंबईत भाजपाचा झेंडा फडकवणार म्हणजे फडकवणार, असा विश्वास नारायण राणेंनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे कंत्राटी मुख्यमंत्री होते 

उद्धव ठाकरे सरपंच होण्याच्या लायकीचे नाहीत  उद्धव ठाकरेच कंत्राटी मुख्यमंत्री होते. राज्याच्या इतिहासात नोंद घेतली इतक्या अपमानित पद्धतीने कुणाला पायउतार व्हावे लागले नसेल. घरात बसून मुख्यमंत्रिपद सांभाळायचे. अडीच वर्षात मंत्रालयात ३ तास गेले. ही कारकिर्द, अशी टीकाही राणे यांनी केली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.