आर्यन खानच्या सुटकेनंतर समीर वानखेडे म्हणाले; “मी नकारात्मक…”

156

बॉलिवूडचा किंग खान शहारूखचा मुलगा आर्यन खानला शुक्रवारी मुंबई क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात एनसीबीकडून क्लीनचीट मिळाली. आर्यन खानच्या सूटकेनंतर एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची चौकशी करणारे समीर वानखेडे यांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आणि त्यांच्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान समीर वानखेडेंनी एक सूचक ट्विट केल्याचे समोर आले आहे.

(हेही वाचा – IRCTC Indian Railway: लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांचे डबे लाल, निळे, हिरवेच का असतात? वाचा उत्तर)

समीर वानखेडेंचं सूचक ट्विट

“मी कधीही नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देत नाही. कारण जर तुम्ही असे केले तर तुमची कोणतीही प्रगती होणार नाही. तुम्ही पुढे जाणार नाही. तुम्हाला नेहमी गोष्टींच्या सकारात्मक बाजूकडे लक्ष द्यावे लागेल आणि आपण नियंत्रित आहोत. जसं, तुम्ही करता त्या निवडींवर तुमचं नियंत्रण असतं”, असे म्हणत समीर वानखेडे यांनी सूचक ट्वीट केले आहे.

दरम्यान, या प्रकरणात आर्यन खानसह ६ जणांना क्लीन चिट देण्यात आली आहे. तसेच एनसीबीने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात आर्यन खानचे नाव घेतले नसल्याचे ही सांगितले गेले. आर्यन खानकडे कोणतेही अंमली पदार्थ आढळले नाहीत. त्यामुळे एनसीबीकडूनच त्याला क्लिनचिट देण्यात आली आहे. कॉर्डिलिया क्रूझवर केलेल्या कारवाईत एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी कारवाई करून आर्यन खानसह १४ जणांना ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली होती. हे प्रकरण वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर या गुन्ह्याचा तपासासाठी एनसीबीने विशेष तपास पथक गठीत करून या गुन्ह्याचा तपास पुन्हा सुरू केला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.