नवाब मलिकांच्या जावयाच्या अडचणी का वाढल्या? जाणून घ्या…

आम्ही समीर खान यांचा बेल रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात गेलो आहोत. समीर खान यांच्याकडे ज्या वस्तू सापडल्या आहेत. त्या वस्तूंबाबत 10 वर्षांची शिक्षा आहे.

80

एनसीबी आता नवाब मलिक यांचा जावई समीर खान यांच्या जामिनाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. त्यामुळे समीर खान यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. एनसीबीने उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. खान यांचा जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालय या प्रकरणावर काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

समीर खानला १० वर्षांची शिक्षा होईल

आम्ही समीर खान यांचा बेल रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात गेलो आहोत. समीर खान यांच्याकडे ज्या वस्तू सापडल्या आहेत. त्या वस्तूंबाबत 10 वर्षांची शिक्षा आहे. समीर खान यांच्यावर आम्ही 27(ए) हे कलम लावले आहे. त्यांच्याकडे काही सापडले नाही. मात्र, त्यांनी या व्यवसायासाठी आर्थिक मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. समीर खान यांना जो जामीन देण्यात आला आहे. त्यात अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. त्यात कोणत्याही प्रकारे तपासाशी संबंधित व्यक्तीवर दबाव आणू नये, असे म्हटले आहे. मात्र, आता आमच्या अधिकाऱ्यांचा नंबर जाहीर करून हा एक प्रकारे तपासावर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याबाबत आम्ही कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न करू, असे एनसीबीने म्हटले आहे.

(हेही वाचा : सरकारने आमदारांना दसऱ्याची काय दिली भेट? वाचा…)

वानखेडे काय म्हणाले?

हे प्रकरण न्यायालयात आहे. माझा नंबर त्यांनी जाहीर केला हे ठीक आहे. त्यांच्याकडे ड्रग्स सापडले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. तर त्याबाबत आलेला रिपोर्ट वाचा. त्यांचा जामीन रद्द व्हावा म्हणून आम्ही वरच्या न्यायालयात गेलो आहोत, असे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.