- प्रतिनिधी
हिंदू जनआक्रोश मोर्चातून नितेश राणेंचं जहाल हिंदुत्ववादी रूप मागील काही महिन्यांपासून जनतेसमोर येत आहे. या मोर्चातून येत असलेल्या नितेश राणे यांच्या वक्तव्यांवर आक्षेप घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने भाजपाच्या वरिष्ठांकडे नाराजी प्रकट केली आहे. त्यांच्या नाराजीची कारण देखील तशीच आहेत. महायुतीमध्ये राहून “एम” फॅक्टरचा वापर करून घेण्याचा उद्देश अजित पवार गटाचा आाहे. ते मुंबई आणि मुंबई शहरालगत असलेल्या पाच विधानसभा क्षेत्रांमध्ये मुस्लिम उमेदवार देणार असल्याने नितेश राणे यांचा विरोध त्यांना करावा लागत आहे. (Assembly Election)
(हेही वाचा – Senate Election 2024 : मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका; मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीवरील स्थगिती उठवली)
दहा टक्के जागा मुस्लिम उमेदवारांना
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मुस्लीम समाजाला सर्वाधिक जागा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. जागावाटपात मिळणाऱ्या एकूण जागांपैकी १० टक्के जागांवर मुस्लीम उमेदवार देणार असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईत चार आणि एमएमआर रिजनमध्ये १ अशा ५ जागांवर मुस्लीम उमेदवार देणार आहेत. महायुतीमध्ये मुंबईत राष्ट्रवादीला ४ जागा सुटणार आणि चारही जागांवर मुस्लीम उमेदवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष देण्याची शक्यता आहे. (Assembly Election)
(हेही वाचा – Atishi CM Oath Ceremony : आतिशी दिल्लीच्या ८व्या मुख्यमंत्री; एलजी यांनी ५ मंत्र्यांना शपथ दिली)
कोण आहेत अजित पवारांचे संभावित मुस्लिम उमेदवार
मुंबई आणि एमएमआर रीजनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाकडून चार ते पाच उमेदवार हे मुस्लिम समाजातून दिले जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते आहे. यामध्ये नवाब मलिक, सना मलिक, जिशान सिद्दीकी आणि नजीम मुल्ला यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्याच पक्षांमध्ये असलेले इतर समाजातील अनेक जण बंडखोरी देखील करू शकतात. (Assembly Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community