शिवसेना नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही (NCP) उभी फूट पडली. त्यामुळे राष्ट्रवादीचा एक अजित पवार गट आणि दुसरा शरद पवार गट असे दोन गट निर्माण झाले. राष्ट्रवादीच्या अनेक आमदार तसेच पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या बंडाचं समर्थन केलं आहे. तर काही आमदार आणि पदाधिकारी अजूनही शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विधानामुळे सर्वत्र चर्चेला सुरुवात झाली आहे. अशातच आता सुप्रिया सुळेंच्या विधानाला शरद पवार यांनी मम् म्हंटल आहे.
काल म्हणजेच गुरुवार २४ ऑगस्ट रोजी सुप्रिया सुळे (NCP) यांनी ‘अजित पवार आमचेच आहेत’ असं एक विधान केलं. त्याबद्दल पत्रकारांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला असता, ‘अजित पवार हे आमचेच नेते आहेत’ असं म्हणत त्यांनी सुप्रिया सुळेंच्या विधानाला पाठिंबा दर्शवला आहे.
(हेही वाचा – ADITYA L 1 : इस्त्रोचे आदित्य-एल-1 मिशन २ सप्टेंबरला लाँच होणार)
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार (NCP) म्हणाले की, अजित पवार हे आमचे नेते आहेतच, त्यात काही वादच नाही. फूट पडणे याचा अर्थ काय? पक्षात (NCP) फूट कधी होते, काही लोकांनी पक्ष सोडला, वेगळी भूमिका घेतली लोकशाहीमध्ये तोत्यांचा अधिकार आहे. वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट म्हणण्याचं काही कारण नाही हा त्यांचा निर्णय आहे असे शरद पवार म्हणाले.
राज्यात वेगवेगळ्या शहरात सभा घेतल्या जात असतानाच अजित पवार (NCP) यांच्याकडून देखील उत्तर सभांचे आयोजन करण्यात येत आहे. बीडमध्ये देखील अजित पवार सभा घेणार असल्याबद्दल शरद पवारांना (NCP) विचारले असता, लोकशाहीत कोणालीही सभा घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्याची चिंता करण्याचं काम नाही. आनंद आहे, लोक आपली भूमिका लोकांच्या समोर मांडायला पुढे येत आहेत. यातलं सत्य जनतेला कळेल. कोणीही जाहीर सभा घेऊन आपली भूमिका मांडत असेल तर मी त्याचं स्वागत करतो असे शरद पवार म्हणाले.
शरद पवार आणि सुप्रिया सुळे (NCP) यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळातून चर्चा रंगू लागल्या आहेत. तर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community