उद्धव ठाकरे अर्थसंकल्पावर बोलत होते, तेवढ्यात अजित पवारांनी मारला डोळा! पहा व्हायरल व्हिडिओ

154

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, शिक्षक आणि अन्य घटकांसाठी मोठ्या प्रमाणात तरतूदी करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंनी गाजर हलवा असे म्हणत टीका केली. परंतु उद्धव ठाकरे जेव्हा या अर्थसंकल्पावर भाष्य करत होते तेव्हा अजित पवारांनी केलेला हावभाव सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी केलेल्या हावभावावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

( हेही वाचा : ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला सर्वाधिकवेळा बोल्ड करणारा कोण आहे ‘हा’ भारतीय गोलंदाज? )

डोळा मारत इशारा, व्हिडिओ व्हायरल 

अर्थसंकल्पाविषयी उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलत असताना अजित पवारांनी उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध दिशेला कोणाला तरी पाहून डोळा मारला. आता अजित पवारांनी नेमका कोणाला डोळा मारत इशारा केला आणि यामागील कारण कळू शकलेले नाही. मात्र या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अजित पवारांचे हावभाव चर्चेचा विषय 

दरम्यान, अर्थसंकल्पाविषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “भावनांशी खेळण्याचा प्रयत्न झालेला आहे. अवकाळी पाऊस झाला, तसा मुंबईत गडगडातही झाला, पण पाऊस काय पडला नाही. हा जो अर्थसंकल्प आहे, तो गरजेल तो बरसेल काय अशा पद्धतीचा आहे. आणि एका वाक्यात सांगायचे तर गाजर हलवा अर्थसंकल्प असे त्याचे मी वर्णन करेल.” अशी टीका उद्धव ठाकरे करत असताना अजित पवारांनी केलेल्या हावभावाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.