नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्ममधील पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा दिल्लीत पार पडत आहे. त्यात महाराष्ट्रातून भाजपाचे ५ आणि शिंदेंच्या शिवसेनेचा एक अशा ६ खासदारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसकडून मात्र एकही खासदाराला आज मंत्रिपदाची शपथ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यमंत्री स्वतंत्र कारभार मिळण्यास विरोध
मोदी ३.० कार्यकाळात महाराष्ट्रातून भाजपचे ५ आणि शिवसेना शिंदे गटाच्या १, अशा सहा खासदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात येत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाला राज्यमंत्री स्वतंत्र कारभार मिळण्याचा प्रस्ताव होता. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यास विरोध दर्शवत मंत्रीपद मिळावे, यासाठी आग्रही राहिले. त्यामुळे या मंत्रिमंडळात नाही तर पुढे मंत्रिमंडळ विस्तारात पण मंत्रीपदच मिळावे, यासाठी आग्रही राहिल्याचे दिसत आहे.
सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या शपथविधीमध्ये मंत्रीपद मिळण्याची शक्यता होती. मात्र भाजपने दिलेले राज्यमंत्री पद राष्ट्रवादीने नाकारले असून आम्हाला केंद्रीय मंत्रिपद हवं असल्याची भूमिका अजित पवार यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदते जाहीर केली.
काय म्हणाले अजित पवार ?
मी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला विनंती केली होती की, संसदेत राष्ट्रवादीच्या खासदारांची संख्या चार होणार असल्याने आम्हाला एक मंत्रिपद मिळावं. त्यांनी ठीक आहे म्हटलं. त्यानंतर त्यांचा आम्हाला मेसेज आला की एका सदस्याला संधी देण्यात येईल. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय मंत्री म्हणून काम केले आहे. केंद्रीय मंत्री असताना राज्यमंत्रीपद स्वतंत्र प्रभार स्वीकारणे आम्हाला योग्य वाटलं नाही. म्हणून आम्ही थांबवण्यासाठी तयार आहोत असे सांगितले. पण आम्हाला केंद्रीय मंत्रीपद हवे आहे असे सांगितले. त्यानंतर त्यांनी जी ऑफर दिली होती ती आम्ही नाकारली, असा खुलासा अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community