- प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातर्फे १८ आणि १९ जानेवारी रोजी शिर्डीत चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींची तयारी आणि संघटनात्मक कामांना बळकटी देण्यावर भर दिला जाणार आहे. प्रतिनिधींच्या वाढलेल्या संख्येमुळे शिबिर संभाजीनगरऐवजी शिर्डीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (NCP Ajit Pawar Shibir)
(हेही वाचा – Garbage Free Hour : मुंबईत आता कचरा मुक्त तास मोहीम; रेल्वे स्थानक, पर्यटन स्थळांसह खाऊ गल्ल्यांवर विशेष लक्ष)
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर संभाजीनगरमध्ये होणाऱ्या मोठ्या मोर्चाशी या शिबिराचा कोणताही संबंध नाही. पक्षाची रणनीती, आगामी निवडणुकींसाठी तयारी, आणि संघटनात्मक बांधणी या मुद्द्यांवर या शिबिरात चर्चा होणार आहे. (NCP Ajit Pawar Shibir)
(हेही वाचा – दिल्लीच्या CM Atishi यांच्यावर गुन्हा दाखल)
तटकरे यांनी सांगितले की, पक्षाच्या कोणत्याही समितीवर वाल्मीक कराड असल्यास त्यावर कठोर कार्यवाही करण्यात येईल. पक्षातील शिस्तबद्धता आणि संघटनेची मजबुती हे शिबिराचे मुख्य उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले. या शिबिरामध्ये पक्षाचे महत्त्वाचे नेते, स्थानिक कार्यकर्ते आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कशाप्रकारे कार्यवाही करायची, यावर या शिबिरात दिशानिर्देश दिले जाणार आहेत. (NCP Ajit Pawar Shibir)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community