NCP : अजितदादांची राष्ट्रवादी परफॉर्मन्समध्ये झिरो; तरीही राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भाजपालाच इशारा!

134
NCP : अजितदादांची राष्ट्रवादी परफॉर्मन्समध्ये झिरो; तरीही राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भाजपालाच इशारा!

अजितदादांच्या राष्ट्रवादीची परफॉर्मन्समध्ये वजाबाकी, पण नेत्यांची नाराजी आणि भाजपाला दमदाटी, अशी खरंच त्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था आहे!! अजितदादांच्या राष्ट्रवादीचा परफॉर्मन्स लोकसभा निवडणुकीत ढिल्ला ठरला. (NCP)

अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून मात्र नाराजीचे सूर उमटले. किंबहुना भाजपाने आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जेव्हा पराभवाची चिकित्सा केली, त्यावेळी आकडेवारी सह अजितदादांच्या परफॉर्मन्सचा पर्दाफाश झाला. मावळ, माढा, सोलापूर, शिरूर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये अजित पवारांचे समर्थक आमदार असूनही त्यांच्याच विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना पीछेहाट सहन करावी लागली. हे आकडेवारीने सिद्ध झाले आहे. त्यावर भाजपाच्या काही नेत्यांनी पक्षांतर बैठकीमध्ये नाराजी व्यक्त केली त्यांनी प्रसार माध्यमांकडे जाऊन नाराजी व्यक्त केली नाही संघाच्या “ऑर्गनायझर” नियतकालिकातून भाजपाला कानपिचक्या देण्यात आल्या. पण भाजपा आणि संघाने केलेली ही चिकित्सा अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागली. राष्ट्रवादीच्या ढिल्ल्या परफॉर्मन्सचे हे सत्य त्यांना पचले नाही. त्यामुळे हसन मुश्रीफ, रूपाली पाटील, अमोल मिटकरी हे अजितदादांचे समर्थक बाहेर येऊन भाजपावरच आरोप लावू लागले. (NCP)

(हेही वाचा – कार्यकर्त्याला पाय धुवायला लावणे हे Nana Patole यांच्या सरंजामी वृत्तीचे दर्शन; रेखाताई ठाकूर यांची टीका)

अजितदादांच्या राष्ट्रवादीला महायुतीत मोठा लाभ

अजित पवार यांना बारामतीतून सुनेत्रा पवारांना निवडून आणता आले नाही. तरीपण अजितदादांनी त्यांना परस्पर राज्यसभेवर घेतले. शिवसेना-भाजपाने त्यांना मूकसंमती दिली. असे असतानाही भाजपा आणि संघाने महायुतीच्या पराभवाच्या केलेल्या चिकित्सेला अजितदादांच्या राष्ट्रवादीचा विरोध आहे. त्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांची चिडचिड झाली आहे. त्यातच राष्ट्रवादीचे बडे नेते छगन भुजबळ यांनी देखील समता परिषदेच्या माध्यमातून स्वपक्षाला तसेच महायुतीला इशारे देण्याचा प्रयत्न देखील केला. वेगळा विचार करण्याची भाषा देखील कार्यकर्त्यांच्या तोंडून बोलवण्यात आली. (NCP)

अजितदादांच्या राष्ट्रवादीला महायुतीत मोठा लाभ मिळाला. त्यांचे जवळपास ९ मंत्री झाले. सुनेत्रा पवारांचा पराभव होऊन देखील त्या राज्यसभेत खासदार झाल्या, पण महाराष्ट्रातल्या महायुतीच्या पराभवाची चिकित्सा राष्ट्रवादीच्या नेत्यांना सहन झाली नाही. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते भाजप वरच जाहीरपणे उलटले. भाजपालाच वेगळा विचार करण्याची दमदाटी करू लागले. आता भाजपा अजितदादांच्या बाबतीत नेमका काय निर्णय घेणार?, त्यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना कोणत्या भाषेत “समजावून” सांगणार?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (NCP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.