सध्या राज्यभर मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय वाढत आहे, अशातच आता चक्क काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आरोप – प्रत्यारोप होऊ लागले आहे. यात आता काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे हे एकमेकांवर टीकाटिपण्णी करू लागली आहे.
काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
जर राष्ट्रवादी काँग्रेसने आमचे सरकार पाडले.नसते तर मराठा समाजाच्या आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तेव्हाच मिटला असता. सहकार क्षेत्रात घेतलेल्या कडक निर्णयामुळे माझे सरकार राष्ट्रवादी काँग्रेसने २०१४ मध्ये पाडले. मला खात्री आहे की माझे सरकार जर पडले नसते. तर आम्ही दोघे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्रित निवडणुकीला सामोरे गेलो असतो आणि २०१४ मध्ये भाजपऐवजी आमचेच सरकार आले असते आणि मराठा आरक्षणाचा प्रश्नही सोडविला असता, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.
काय म्हणाले सुनील तटकरे?
राष्ट्रवादीच्या विरोधात काम करायला पृथ्वीराज चव्हाणांना दिल्लीतून पाठवण्यात आले होते. पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ राजकारणी आहेत, असे इतके दिवस मानत होतो. परंतु अलीकडे त्यांना हा विनोद का सुचला हे माहिती नाही. २०१४ मध्ये मंत्रिमंडळात होतो. राणे समिती नेमली गेली आणि मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) दिले गेले. मात्र ते उच्च न्यायालयात टिकले नाही. त्यामुळे २०१४ सत्ता गेल्यावर ते टिकले नाही किंवा राष्ट्रवादीमुळे टिकले नाही हे बोलण्यामागे त्यांचा हेतू काय आहे हे कळू शकले नाही, असे सुनील तटकरे यांनी सांगितले. तसेच एक बाब नक्की आहे की २०१४ मध्ये काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसने मागितलेल्या जागांवर पहिले उमेदवार जाहीर केले. मी त्यावेळी प्रदेशाध्यक्ष होतो. आम्हाला गाफील ठेवून कुठल्या जागा हव्यात याची माहिती काढून घेतली परंतु आतापर्यंतचा प्रघात आहे की निवडणूकपूर्व दोन राजकीय पक्षांची युती किंवा आघाडी होत असते त्यानंतर यादी घोषित करतात. परंतु पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात काम करण्यासाठी सुपारी देऊनच दिल्लीतून पाठवण्यात आले होते, असा गौप्यस्फोट सुनील तटकरे यांनी यावेळी बोलताना केला.
Join Our WhatsApp Community