राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अनिल देशमुख यांच्या जामिनाच्या स्थगितीला मुदत वाढवून देण्याच्या सीबीआयच्या मागणीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांचा तुरूंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सीबीआयने अनिल देशमुख यांच्या जामिनाला स्थगिती देण्यासाठी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यानंतर देशमुखांची ऑर्थर रोड तुरूंगातून उद्या, बुधवारी सुटका होणार आहे.
(हेही वाचा – शिंदे गटाच्या ‘या’ नेत्यानं राऊतांना फटकारलं, ‘त्यांच्या लवंगी फटाक्याने कुत्रही पळत नाहीत, आम्ही तर…’)
12 डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला होता. पण या निर्णयाला सीबीआयने आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, अनिल देशमुख यांच्या जामिनाला स्थिगिती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका सीबीआयकडून दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज, मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत अनिल देशमुख यांचा जामीन कायम ठेवला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयची याचिका फेटाळून सीबीआयला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यास नकार दिला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाकडून अनिल देशमुखांना जामीन मंजूर करण्यात आला होता. पण, सीबीआयने केलेल्या मागणीनंतर देशमुखांच्या जामिनाला १० दिवसांची स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने न्यायालयाला विनंती करत देशमुखांच्या जामीन अर्जाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने सीबीआयच्या विनंतीनंतर देशमुखांच्या जामिनाला स्थगिती दिली होती. त्यामुळे जामीन मिळाल्यानंतरही देशमुख हे तुरूंगातच होते. अखेर आज, मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी फेटाळली आणि अनिल देशमुखांचा तुरूंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Join Our WhatsApp Community