राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता भाजप, शिवसेना आणि काँग्रेसनंतर राष्ट्रवादीनेही विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात आपले गडी उतरवले आहेत. भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, स्वतः एकनाथ खडसे यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचे आभार मानले आहेत.
मी गेली 30 वर्षे सातत्याने राज्याच्या राजकारणात सक्रीय आहे. त्यामुळे आमदारकीचं फार कौतुक नाही. पण ज्या परिस्थितीत मला भाजपने ढकललं, त्यानंतर जो आधार मला राष्ट्रवादीने दिला त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
(हेही वाचाः काँग्रेसचा भोंगळ कारभार : विधान परिषदेच्या निवडणुकीतही प्रिंटिंग मिस्टेक)
राष्ट्रवादीने राजकीय पुनर्वसन केलं
भाजपमध्ये मला अडगळीत पडल्यासारखं वाटत होतं पण राष्ट्रवादीने मला आधार देऊन माझं राजकीय पुनर्वसन केलं, त्यामुळे त्यांच्याशी प्रामाणिक राहणं हे माझं कर्तव्य आहे. आता खडसेंची राजकीय कारकीर्द संपली असं बोललं जात होतं. पण असं असताना सुद्धा शरद पवार यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो खूप मोठा आहे. त्यामुळे मी कायम त्यांचा ऋणी आहे, असेही खडसे मिळाले.
मुंडे कुटुंबीयांवर अन्याय
विधान परिषदेसाठी भाजपने पंकजा मुंडे यांचा पत्ता कट केल्यामुळे त्यावरही एकनाथ खडसे यांनी भाष्य केलं आहे. खरंतर मुंडे,महाजन,खडसे,फुंडकर यांनी मारवाडी आणि ब्राह्मण अशी ओळख असलेल्या भाजपला बहुजन समाजाचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. गोपीनाथ मुंडे यांचा भाजपचा विस्तार करण्यात मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी न देणं हा त्यांच्यावर अन्याय असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना शिराळा न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट)
Join Our WhatsApp Community